शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ-शिंदे गटाकडे ‘गोडसाखर’

By admin | Updated: March 30, 2016 01:39 IST

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : ११ जागा जिंकल्या; शहापूरकर गटाला ८ जागा, अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर पराभूत

गडहिंग्लज : अतिशय चुरशीच्या झालेल्या हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ व श्रीपतराव शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकत सत्ता काबीज केली, तर विरोधी डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, भाजप, शिवसेना व इतर पक्षांच्या काळभैरी शेतकरी विकास पॅनेलला ८ जागा मिळाल्या. रात्री १ वाजता शेवटच्या एका जागेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह नलवडे, सदानंद हत्तरकी यांनी विजय संपादन केला, तर जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, उदय चव्हाण, आदींना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. सकाळी साडेआठच्या सुमारास संस्था गटातील पहिला निकाल हाती आला. त्यात शहापूरकर पॅनेलच्या सदानंद हत्तरकी यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ कौलगे-कडगाव गटातून स्वत: डॉ. शहापूरकर व अनंत कुलकर्णी यांनी बाजी मारली. त्यामुळे शहापूरकरांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान, गडहिंग्लज-हनिमनाळ गटातून शिंदे-मुश्रीफ पॅनेलच्या संग्रामसिंह नलवडे, विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ भडगाव-मुगळी गटातून अमर चव्हाण व सतीश पाटील यांनी बाजी मारली, तर ‘काळभैरी’चे प्रकाश चव्हाण यांनाही पुन्हा संधी मिळाली.नूल-नरेवाडी गटातून माजी अध्यक्ष शिंदे हे एकमेव विजयी झाले, तर ‘काळभैरी’मधून सुभाष शिंदे व विद्यमान संचालक किरण पाटील विजयी झाले. महागाव-हरळी गटात शिंदे-मुश्रीफ आघाडीचे विद्यमान संचालक प्रकाश पताडे यांच्यासह दीपक जाधव व विद्याधर गुरबे विजयी झाले.दरम्यान, रविवारी चुरशीने झालेल्या या तिरंगी निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले होते. त्याचवेळी संमिश्र कौल मिळण्याचे संकेत मिळाले होते. १९ जागांसाठी तीन प्रमुख पॅनेलसह ३० अपक्ष मिळून तब्बल ८७ उमेदवार रिंगणात होते. ऊस उत्पादक गटातील एकूण २३,९२४ पैकी १९,०४१ सभासदांनी, तर संस्था गटातील १८८ पैकी १८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुज्ञ सभासदांनी प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला आहे. हा साखर कारखाना म्हणजे आपली खासगी जहागिरी समजणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही घाम फोडला. स्वाभिमानी संघटनेने अवसानघातकीपणा केला नसता तर चित्र आणखी वेगळे दिसले असते.- चंद्रकांतदादा पाटीलपालकमंत्री व विरोधी काळभैरव पॅनेलचे प्रमुख नेतेशेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवारअ‍ॅड़ श्रीपतराव दिनकरराव शिंदे, संग्रामसिंह आप्पासाहेब नलवडे, सतीश भीमगोंडा पाटील, अमर रामचंद्र चव्हाण, विद्याधर बाबूराव गुरबे, प्रकाश धोंडिबा पताडे, बाळकृष्ण विष्णू परीट, जयश्री सचिन पाटील, सागर राजशेखर हिरेमठ, बाळासाहेब बंडू मोरे, दीपक भैयासो जाधव.काळभैरी शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवारडॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश भीमराव चव्हाण, सुभाष नारायण शिंदे, किरण मलगोंडा पाटील, सदानंद हत्तरकी, संभाजी नाईक, अनंत कुलकर्णी, क्रांतिदेवी किसनराव कुराडे.