शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांच्याकडून जि. प. सदस्यांना २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:25 IST

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विरोधकांसह सर्व सदस्यांना ३०५४ योजनेतून प्रत्येकी २५ लाख रुपयांचा ...

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विरोधकांसह सर्व सदस्यांना ३०५४ योजनेतून प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. मुश्रीफ हे सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय भोजे आणि भाजपचे सदस्य प्रसाद खोबरे यांच्या या निधीमागणीला मुश्रीफ यांना तात्काळ प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ आले होते. मुश्रीफ यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. ते परत जाताना भोजे आणि खोबरे यांनी निधीचा विषय काढला. तेव्हा मुश्रीफ यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना बोलावून प्रत्येक सदस्याला ३०५४ मधून २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. शासनाकडून विशेष रस्ता दुरूस्तीसाठी हा निधी दिला जातो. विरोधी सदस्यांच्या मागणीला मुश्रीफ यांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादामुळे सदस्यही अवाक‌् झाले.