एकाच गटाकडे सत्ता न देता सत्तांतर करण्याचा जनतेचा निर्धार यावेळीही कायम राहिला.
जुन्या मंडलिक-घाटगे गटातच टोकाचा संघर्ष झाला. मुश्रीफ गटाला अंतर्गत वाद भोवला असून मतविभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
सत्तांतरासाठी ए. वाय. पाटील, ए. टी. पाटील, पी. डी. चौगुले, धनंजय पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, विलास पाटील यांनी, तर बंडोपंत चौगुले यांच्या मदतीने सत्ता अबाधित राखण्यासाठी रमेश पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, दिनेश पाटील यांनी प्रयत्न केले. तिसऱ्या आघाडीकडून शिवानंद माळी, वर्षा पाटील, सदाशिव गोरे यांनी परिश्रम घेतले.
मुश्रीफांनाही वाद मिटविण्यात अपयश...
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी केलेल्या तिसऱ्या आघाडीने प्रत्येक वॉर्डात ५३ पासून २०२पर्यंत मते घेतली. तसेच, माजी जि. प. सदस्य माळी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
नियतीनेच दिले निष्ठेचे फळ...
माजी आमदार संजय घाटगे यांच्याप्रती प्रचंड निष्ठा आणि आत्मीयता असणारे महादेव चौगुले यांच्या पत्नी सुनीता चौगुले यांना सरपंच पदाचा बहुमान मिळणार आहे. घाटगे यांची कोणतीही निवडणूक असो घरावर तुळशीपत्र ठेवून चौगुले कार्यरत असत. त्यामुळे नियतीनेच त्यांच्या पदरात हे पद बहाल केले असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.