महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये माझी पोषण परसबाग ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मुरुक्टे येथे माझे पोषण परसबागअंतर्गत सामूहिक परसबाग, तसेच वैयक्तिक परसबाग महिलांनी तयार करून या अभियानात सहभाग घेतला. मुरुक्टे गावातील बचत गटातील महिलांना परसबाग निर्मिती प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रास्ताविक गीता खोचारे यांनी केले. अस्मिता पाटील यांनी परसबागेचे महत्त्व सांगितले.
यावेळी अस्मिता पाटील म्हणाल्या, परसबागेमध्ये सात वाफ्यामध्ये सात प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. जेणेकरून आठवड्यातील प्रत्येक दिवशी आहारामध्ये वेगळ्या भाजीचा समावेश होईल. सर्व प्रकारची जीवनसत्वे महिलांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळतील. पोषण परसबाग तयार केल्यामुळे सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होईल. यावेळी संध्या भांडवलकर, संजीवनी ऱ्हाटवळ, सविता गडकरी, सुनीता गुरव, लता मिटके यांच्यासह बचतगट महिला उपस्थित होत्या.