शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी विजयने मारले नेर्ले कुस्ती मैदान

By admin | Updated: March 30, 2015 00:24 IST

या मैदानात लहान-मोठ्या १०० हून अधिक कुस्त्या झाल्या.

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे जंगली महाराज आश्रमच्यावतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात आत्मा मलिक कुस्ती केंद्राचा मल्ल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने लपेट डावावर महावीर केसरी अण्णा कोळेकर याच्यावर रोमहर्षक विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. या मैदानात लहान-मोठ्या १०० हून अधिक कुस्त्या झाल्या.रामनवमीनिमित्त आयोजित या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाच्या लढतीत सचिन जामदार याने राजाराम यमगर (मोतीबाग) याच्यावर अत्यंत अटीतटीच्या लढतीत घुटना डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत जयपाल वाघमोडे याच्यावर संदीप माने याने विजय मिळवला. चतुर्थ लढतीत कैलास सुरटी (शाहूवाडी) याच्यावर विश्वजित कदम याने नेत्रदीपक विजय मिळवला. सर्वांत प्रेक्षणीय कुस्ती ठरली ती वाटेगावचा मल्ल सुकुमार जाधव व अमित कारंडे (गंगावेश) यांची. यामध्ये अमितने मच्छिगोता डावावर सुकुमारवर विजय नोंदवला. इतर विजयी मल्लांमध्ये विवेक नायकल, नीलेश कोरे, दिग्विजय पाटील, सचिन वाघ, भाऊ पाटील, अभिजित माने, शुभम चव्हाण, निरंजन बालगावे, रोहन रणखांबे, अजय केसरे, सौरभ झेंडे, अमन मुल्ला, अबू मुल्ला, हृषीकेश कदम, सूरज वीरकर, अभिषेक पाटील, गौरव कदम यांचा समावेश आहे.यावेळी दिलीपराव पाटील, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गणपतराव आंदळकर, दीनानाथ सिंह, शिवाजी पाचपुते, बापू लोखंडे, आनंदराव धुमाळ, हणमंतराव जाधव, अशोक मोरे, लिंबाजी पाटील, अमन सावंत, बाळासाहेब देसाई, हर्षवर्धन देसाई, हणमंतराव पाटील, अभिजित धोंडपुडे उपस्थित होते.शंकर पुजारी, ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. आप्पासाहेब कदम, झुंजार पाटील, धनंजय महाडिक, सतीशकाका पाटील, जयसिंग कदम, उमेश महाडिक, प्रकाश आम्रे, सचिन वंजारी, धनाजी रणखांबे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)