शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून ‘स्थायी’साठी मुरलीधर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:55 IST

समिती सभापती निवडी : विरोधी आघाडीतर्फे सत्यजित कदम, रूपाराणी निकम यांचे अर्ज; ‘परिवहन’साठी लाला भोसले, विजयसिंह खाडेंचे अर्ज

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवार म्हणून अपेक्षेप्रमाणे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुरलीधर जाधव यांनी अर्ज भरला, तर विरोधी ताराराणी आघाडीतर्फे सत्यजित कदम, रूपाराणी संग्रामसिंह निकम यांनी अर्ज भरले, तर परिवहन सभापतिपदासाठी विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील (भाजप), लाला शिवाजी भोसले (काँग्रेस) यांनी अर्ज भरले. सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने त्यांचे उमेदवार विजयी होतील, परंतु शिवसेनेने भाजप-ताराराणी आघाडीला मदत करायची ठरविल्यास मात्र या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. स्थायी समिती, परिवहन समिती व महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजता ताराराणी सभागृहात ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वांशी चर्चा केली. त्यातून त्यांनी परिवहन समिती व प्रभाग समिती सभापतींची नावे गटनेते शारंगधर देशमुख यांच्याकडे दुपारी दिली. ताराराणी आघाडी व भाजप नेते आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, सत्यजित कदम, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता विजय सूर्यवंशी यांची बैठक होऊन त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संमतीने त्यांच्या आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या तीन इच्छुकांशी चर्चा करून दुपारी फोनवर गटनेते सुनील पाटील यांना नावे सांगितली. ताराराणी आघाडीकडून स्थायी समितीसाठी दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर राष्ट्रवादीकडून सूरमंजिरी लाटकर यांचे नाव पुढे आले तर त्यांच्या विरोधात ‘ताराराणी’च्या रूपाराणी निकम लढतील असा निर्णय घेतला होता; परंतु मुरलीधर जाधव यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्या विरोधात आता सत्यजित कदम लढतील, अशी अपेक्षा आहे.