शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेश्वर पेठेतील तरुणावर खुनी हल्ला

By admin | Updated: July 14, 2016 00:38 IST

देवकर पाणंद चौकातील घटना : चौघा तरुणांवर गुन्हा

कोल्हापूर : येथील देवकर पाणंद चौकात अज्ञात चौघा तरुणांनी तरुणावर खुनी हल्ला केला. विक्रम सुरेश घाटगे (वय २८, रा. जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ) असे त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर, छातीवर, पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्ला कोणी केला व कोणत्या कारणांतून झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याबाबत पोलिसांनी सांगितले, देवकर पाणंद चौकात वाहनांसह नागरिकांची गर्दी असते. याठिकाणी रिक्षास्टॉपही आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास विक्रम घाटगे हा मोटारसायकलवरून देवकर पाणंदकडून उत्तरेश्वर पेठकडे जात असताना देवकर पाणंद चौकात चौघा तरुणांनी त्याला अडविले. शिवीगाळ करत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यानंतर एकाने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर पडून राहिला. भरचौकात झालेला हल्ला पाहून नागरिक भयभीत झाले. हल्लेखोर तरुणांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. जखमी विशाल हा बेशुद्ध असल्याने नेमका हल्ला कोणी केला. कोणत्या कारणासाठी केला, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. त्याचे वडील सुरेश शिवाजीराव घाटगे हे सीपीआरमध्ये आले. त्यांच्यापाठोपाठ त्याचे नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. पोलिसांनी वडिलांचा जबाब घेतला असता त्यांनी माझी मानसिक स्थिती बरोबर नाही. मुलाचे कोणासोबत पूर्ववैमनस्य होते ते मला माहीत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांची फिर्याद घेऊन अनोळखी चौघा तरुणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न (३०७) गुन्हा दाखल केला. हल्ल्याची माहिती मिळू शकत नसल्याने पोलिसांनी देवकर पाणंद चौकात येऊन तेथील रिक्षाचालक, दुकानदार, हॉटेलमालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही आहेत का, याचीही चाचपणी पोलिसांनी केली. विशाल शुद्धीवर आल्यानंतर हल्लेखोर कोण होते. त्यांनी हल्ला का केला, हे उघड होणार आहे. मोबाईलवरील कॉलची माहिती विशाल हा शेती करतो. तो उत्तरेश्वर पेठेत राहत असताना देवकर पाणंद चौकात आला कसा, त्याला कोणी बोलावून घेतले होते का? त्याच्यावर मोबाईलवर आलेल्या कॉल्स्ची पोलिस माहिती घेत आहेत. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याने उत्तरेश्वर पेठेत तणाव पसरला आहे. नागरिकांकडून बघ्याची भूमिका गंभीर जखमी अवस्थेत विशाल रस्त्यावरच पडून होता. त्याला मदत करण्याचे धाडस येथील एकाही नागरिकाने केले नाही. त्यांच्यासमोरच हल्लेखोर त्याला मारहाण करत होते; परंतु कोणीही पुढे होऊन त्याची सुटका केली नाही. काही वेळाने त्याने स्वत:च मोबाईलवरून मित्रांना ही माहिती दिली. मित्र घटनास्थळी येईपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. मित्रांनी त्याला रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्याला हलविले. (प्रतिनिधी)