दरम्यान, रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी ‘स्टेला’ नामक श्वानाला आणण्यात आले. श्वान घटनास्थळ परिसरातच घुटमळत राहिला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला खोत या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजू मोरडे यांच्या शेतात शेतमजुरीसाठी गेली होती. दुपारच्या सुमारास घराकडे परतत असताना किशोर माणगावे यांच्या शेतामध्ये या महिलेच्या मानेवर पाठीमागून धारधार शस्त्राने वार केल्याने ती जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. घटनास्थळी चा-याचे गाठोडे पडले तर हातामध्ये तिचा मोबाइल घट्ट पकडलेल्या अवस्थेत होता.
इतर महिला मजुरी करून परतत असताना खुनाची घटना उघडकीस आली. खून झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळ परिसरात खुनासाठी वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेतला. मात्र काहीही आढळून आले नाही. मृत महिलेच्या पश्चात मुलगा व विवाहित मुलगी आहे.
चौकट - पोलिसांकडून मोबाइल जप्त
अज्ञात व्यक्तीने खून करून फरार झाला आहे. त्यामुळे खुनी कोण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत महिलेच्या हातात मोबाइल होता. पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून, या मोबाइलवरून खुन्यापर्यंत पोहोचणे सोपे जाणार आहे.