शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

गडहिंग्लज : दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नगरपालिका शाळांनी खासगी शाळांच्या स्पर्धेतदेखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले असून त्या मॉडेल स्कूल ...

गडहिंग्लज : दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नगरपालिका शाळांनी खासगी शाळांच्या स्पर्धेतदेखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले असून त्या मॉडेल स्कूल बनविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

येथील काळू मास्तर विद्यालयात गडहिंग्लजचे आद्यशिक्षक काळू नाना पोवार यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त अयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालय व शिक्षण समिती सभापती सुनिता पाटील होत्या.

मुख्याधिकारी मुतकेकर म्हणाले, केवळ शैक्षणिक गुणवत्तेमुळेच काळू मास्तर विद्यालयाची पटसंख्या ४ वर्षात चौपट झाली आहे. शाळेच्या सर्व भौतिक गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. प्रारंभी नेहरू चौकातील काळू मास्तरांच्या पुतळ्याचे पूजन सभापती पाटील यांच्या हस्ते तर काळू मास्तरांच्या निवासस्थानी गुंड्या पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

कार्यक्रमास नगरसेवक हारूण सय्यद व उदय पाटील, प्रभाकर डोमणे, प्रकाश पोवार, संतोष सावरतकर, सागर पाटील, पांडुरंग कांबळे, मिनाज अत्तार, राजश्री देवेकर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक विष्णू कुराडे यांनी प्रास्ताविक केले. किरण भोसले यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा पाटील यांनी आभार मानले.

चौकट :

मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

कोरोना लढ्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांचा तर काळू मास्तरांच्या माहितीचा डिजिटल बोर्ड तयार केल्याबद्दल गुंड्या पाटील यांचा नगरसेवक उदय पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथे नेहरू चौकातील काळू मास्तरांच्या पुतळ्याचे पूजन सुनिता पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गुंड्या पाटील, प्रकाश पोवार, प्रभाकर डोमणे, विष्णू कुराडे, सागर पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : २००७२०२१-गड-०२