शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या वाढीसाठी महापालिका मैदानात

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

प्राथमिक शिक्षण मंडळ सज्ज : शाळा प्रवेशोत्सव सप्ताहाचे सोमवारपासून आयोजन--शाळेची लगबग

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती सध्या सुधारत आहे. दर्जेदार शिक्षणासोबत आता पटसंख्या वाढीसाठी प्राथमिक शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. ‘महानगरपालिका शाळा प्रवेशोत्सव सप्ताह’ सोमवार (दि. ८) पासून राबविण्यात येणार आहे. सप्ताहात शाळा परिसरात रॅली, शहरातून महारॅली, पालक भेट अशा उपक्रमांचे नियोजन केले असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते व प्रभारी प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.सभापती मोहिते म्हणाले, महापालिका शाळांची पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांची उपस्थिती वाढविणे, स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासह अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी करणे, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव सप्ताह सोमवारपासून १३ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. सप्ताहाची सुरुवात सोमवारी सकाळी आठ वाजता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नगरसेवक, महिला बचत गट यांच्या सभेने होईल. त्यानंतर शाळा परिसरातून रॅली काढण्यात येईल. महापालिकेच्या शाळांबाबत जनजागृती करण्यासाठी मंगळवारी (दि. ९) सकाळी नऊ वाजता शहरातून महारॅली काढण्यात येणार आहे. महापालिका, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, शिक्षण मंडळाची इमारत असा रॅलीचा मार्ग आहे. यात महापालिका आयुक्त, अधिकारी, नगरसेवक, शिक्षक व कर्मचारी सहभागी होतील. रॅलीत पथनाट्ये, लेझीम आणि झांजपथक असणार आहे. रॅलीद्वारे पालकांना प्रवेशाबाबत आवाहन केले जाणार आहे. प्रभारी प्रशासनाधिकारी सुर्वे म्हणाल्या, शाळापातळीवर बुधवार (दि. १०) पासून पात्र विद्यार्थी-पालक भेट, माता-पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शाळा सुशोभीकरण व वर्गसजावट उपक्रम राबविण्यात येतील. प्रवेश दिंडी काढून १५ जूनला नवविद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाईल. पत्रकार परिषदेस मंडळाचे सदस्य भरत रसाळे, समीर घोरपडे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी आर. बी. रावळ, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, मोहन सरवळकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना बूट देण्याचे नियोजनमहापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थी यावेत, यासाठी दोन वर्षांपूर्वी गणवेशात बदल केला. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना टाय देण्यात आले. यंदा विद्यार्थ्यांना बूट देण्याचे नियोजन असल्याचे सभापती मोहिते यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.