शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

सरवदे यांची घोषणा : आठवले गट महायुतीतून बाहेर

कोल्हापूर : भाजप सरकारने खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिले नाही़ सत्तेमध्येही दहा टक्के वाटा दिलेला नाही; त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आरपीआय’ स्वबळावर लढेल़़, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी शुक्रवारी केली़ पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे शाहू स्मारक भवनात सन्मान परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ़ कृष्णा किरवले, प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव, प्रा़ विजय काळेबाग, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. प्रा़ कांबळे यांचा राजर्षी शाहूंचा पुतळा व फेटा देऊन गौरव केला़ परिषदेपूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सरवदे यांच्या हस्ते झाले़सरवदे म्हणाले, गेली पंधरा वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून निराशा पदरी आली़ आता भाजपनेही तीच री ओढली आहे़ येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत़ शहाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात रिपलिब्कन चळवळ रुजविण्याचे काम केले़ प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संविधानातील बदल, आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुप्त डाव सुरू आहेत़ डॉ़ आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा पुरस्कार करणारे गोविंद पानसरे व डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना डोळसपणे पाहिल्या पाहिजेत़डॉ़ कृष्णा किरवले म्हणाले, आंबेडकरी प्रवाहाचा गैरफायदा घेत काहींनी आरपीआय गटांना बदनाम करण्याचे ठरविले आहे़ आंबेडकरी चळवळीपुढे डावे-उजवे यांचे आव्हान तर आहेच़, याशिवाय आंबेडकरी चळवळीतीलच काही प्रवाह गुप्तपणे आरपीआय गटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करीत आहेत़ प्रा. विजय काळेबाग, डॉ़ अनिल माने, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक बबन सावंत, संजय लोखंडे, रूपा वायंदडे, प्रा़ सुरेखा कांबळे, आदींची भाषणे झाली़ यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शामप्रसाद कांबळे, बी़ के. कांबळे, सचिव मंगलराव माळगे, अशोक सरवदे, आदी उपस्थित होते़ शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले़ सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)तिथून चळवळनामांतर, ‘रिडल्स’मधील लढाऊ आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी केले होते; पण या कार्यकर्त्यांचा विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला अन् तिथून चळवळ सुरू झाली, असे प्रा़ शहाजी कांबळे म्हणाले.