शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष

By admin | Updated: May 17, 2017 01:19 IST

नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची धास्ती : काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध पावले; भाजपची जोरदार तयारी

शीतल पाटील ।  -लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील दुफळी, विरोधी राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, त्यातून भाजप प्रवेशासाठी लागलेली फिल्डिंग या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष लागले असून, वर्षभरानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ते भाजप कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याची उत्सुकताही आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. त्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने दोन्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही नगरसेवक आतूर झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेसमध्ये दीड वर्षापासून फूट पडली आहे. उपमहापौर गटाच्या नावाखाली काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्र चूल मांडली. स्वपक्षीयांच्या कारभाराविरोधात उपमहापौर गटाने मध्यंतरी चांगलीच उचल खाल्ली होती. त्याला माजी आमदार संभाजी पवार यांच्या स्वाभिमानी आघाडीचीही साथ मिळाली. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीपेक्षा उपमहापौर गटच विरोधकांची भूमिका पार पाडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सध्या महापौर बदलावरून काँग्रेसमध्ये राजकारण सुरू आहे. त्यामुळे पक्षावर नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्थायी समिती सभापती, मागासवर्गीय समिती व प्रभाग समिती चारच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे नेतृत्व जयश्रीताई पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे असले तरी, निष्ठावंतांची घटती संख्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. विरोधी राष्ट्रवादीतही सारे काही आलबेल राहिलेले नाही. आमदार जयंत पाटील यांची एकहाती पकड असलेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांतही संघर्ष पेटला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील गटात राष्ट्रवादीची विभागणी झाली आहे. विरोधी पक्षनेता निवडीवेळी त्याचा प्रत्यय आला आहे. अजूनही हा संघर्ष संपलेला नाही. त्यात जयंत पाटील यांनी काँग्रेसमधील एका गटाला चुचकारल्याने मिरजेतही नाराजीचा सूर उमटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, ज्येष्ठ नगरसेवकांनी आतापासूनच आघाडीचे राजकारण सुरू केले आहे. त्याला काहींचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यात मिरज पॅटर्नने सवतासुभा मांडत वेगळे अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. मिरजेतील इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान अशी दिग्गज नेतेमंडळी एकत्र आली आहेत. मिरजेतील एक गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होती. मिरज पॅटर्नला भाजपमध्ये घेण्यावरूनही पक्षात वादविवाद आहेत. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर येत आहेत. सध्या तरी त्यांचे सर्व कार्यक्रम शासकीय असले तरी, यावेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा अथवा जाहीर सभा नसल्याने पक्षप्रवेशाबाबत साशंकता असली तरी, भाजपच्या काही मंडळींनी मोजक्याच नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हजर करण्याची तयारी चालविली आहे. वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने गेल्या दोन महिन्यापासूनच सुरू केली आहे. त्यात फडणवीसही त्यांच्या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देतील. त्याकडे पालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांचेही लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेनंतरच गतीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काहीजण इच्छुकही आहेत. त्यात मिरजेतील नगरसेवकांचा अधिक समावेश आहे. पण त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या काही मंडळींचा विरोध आहे. सांगली व कुपवाडमधील काहीजण कुंपणावर आहेत. प्रभाग रचना कशी होते, कोणत्या पक्षातून निवडणूक लढविल्यास ती फायदेशीर ठरेल, याचा विचार करूनच ही कुंपणावरील मंडळी पक्षबदल करणार असल्याचे समजते. निवडणुकीसाठी रणनीतीगेल्या दोन महिन्यांपासून भाजपने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकताच कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्गही झाला. आता २५ मेपासून भाजपने विस्तारक म्हणून नियुक्त केलेले कार्यकर्ते बुथनिहाय जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. गेल्या चार वर्षातील काँग्रेसचा कारभार, फडणवीस सरकारने आखलेल्या योजना, शासनाची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे.