शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

सांगलीच्या क्रीडापटलावर महापालिकेची मुसंडी

By admin | Updated: August 28, 2015 23:00 IST

संघटनांमधील वाद चव्हाट्यावर : शालेय महापालिका स्पर्धांचे स्वतंत्र आयोजन

आदित्यराज घोरपडे - हरिपूर --महापालिकेने यंदा प्रथमच शालेय महापालिकास्तर स्पर्धा स्वत:च्या हिमतीवर भरविल्या आहेत. भलेही तिजोरीत आर्थिक चणचण असेल, पण सांगलीच्या क्रीडापटलावर महापालिकेने जिद्दीने मारलेली मुसंडी विचार करायला लावणारी आहे. सांगली वगळता राज्यातील इतर महापालिका शालेय क्रीडा स्पर्धा स्वतंत्रपणे घेतात. सांगलीत मात्र जिल्हास्तरीय स्पर्धांसह महापालिकास्तरीय स्पर्धाही जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेतल्या जायत. यंदा हे चित्र बदलले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे, तर महापालिकास्तरीय स्पर्धा महापालिकेतर्फे आयोजित केल्या आहेत. क्रीडाधिकारी म्हणून नितीन शिंदे यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे स्पर्धेची जबाबदारी सोपवली आहे. शालेय स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना शिंदे यांनी धाडसाने हे आव्हान खांद्यावर घेतले. त्यांनी पदरमोड करून विजेत्यांना पदक व चषक देण्याची प्रथा सुरू केली. निरपेक्ष हेतूने एकत्र आलेल्या क्रीडाशिक्षक व प्रशिक्षकांमुळेच महापालिकेचा क्रीडा विभाग बळकट झाला आहे. या ‘स्पोर्टस् फोर्स’मध्ये सुहास व्हटकर, मधुकर साळुंखे, बापू समलेवाले, सूरज शिंदे, राजेंद्र कदम, देवाप्पा चिपरीकर, विनायक विभुते, निखिल चोपडे, सचिन हरोले, सुरेश चौधरी, परेश पाटील, रूक्साना मुलाणी, सतीश तासगावे, मुन्ना आलासे, शुभम जाधव, दीपक राऊत, प्रताप पाटील, विलास गायकवाड हे शिलेदार आघाडीवर आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ही शहरातील दोन क्रीडांगणे. क्रीडांगणांच्या विकासाकडे या विभागाने लक्ष वळवले आहे. शालेय क्रीडा संपल्यानंतर ही क्रीडांगणे उजळून निघणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये चार लॉन टेनिस मैदाने, एक बास्केटबॉल मैदान, क्रीडा वसतिगृह, चारशे मीटर धावण मार्गाची दुरूस्ती, जलतरण तलावाची दुरूस्ती अशी कोट्यवधीची कामे पार पडली. अंतर्गत कुरघोड्यांमुळे हे कार्यालय चर्चेत आले आहे. माहिती अधिकार आणि तक्रारींमुळे हे कार्यालय अक्षरश: बेजार झाले आहे. ‘ईगो’ नावाचा नवीन खेळ...शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळांची संख्या ८१ पर्यंत पोहोचली आहे. यात भरीस भर म्हणून ‘ईगो’ नावाच्या खेळाने अप्रत्यक्षपणे क्रीडांगणावर शिरकाव केला आहे. काही प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांना याची लागण झाली आहे. ‘तू मोठा की मी मोठा’ या संघर्षामुळे विविध क्रीडा संघटनांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच क्रीडा क्षेत्रातील काही मंडळींनी धन्यता मानली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे क्रीडाप्रेमी खेळापासून दुरावले आहेत. एकविध खेळांच्या संघटनेवर सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्यांनी स्वार्थी वृत्ती सोडून खेळ आणि खेळाडूंचा व्यापक विचार करण्याची गरज आहे. क्रीडा घडामोडी...सिंगापूरमधील जागतिक चॉक बॉल स्पर्धेत सांगलीच्या दोघींना कास्यपदकगौतम पाटील यांच्यारूपाने जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्षपदमुन्ना कुरणे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवडबुध्दिबळात समीर कठमाळेची ग्रॅण्डमास्टर किताबाकडे वाटचालमहापालिकेने स्केटिंग ट्रॅकचा चेहरामोहरा बदलला. लाईट व्यवस्था, रंगकाम आणि ट्रॅकच्या पृष्ठभागाची दुरूस्ती चौदापेक्षा अधिक खेळाडू राज्य व केंद्र शासनाच्या सेवेत दाखलपाच जिल्ह्यांच्या एकत्रित शासकीय स्वयंसिध्दा क्रीडा शिबिराचा सांगलीला दुसऱ्यांदा मान जिल्ह्यात वर्षभरात डझनभर विविध खेळांच्या राज्य-राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी