शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर जाधव यांचे नगरसेवकपद रद्द करावे

By admin | Updated: March 30, 2016 01:09 IST

भाजपची निदर्शने : कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनास शिष्टमंडळाचा इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांचे बेटिंग व्यवसायाशी संबंध असून, एका गुन्ह्यात त्यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने केली. उद्या, गुरुवारी होणाऱ्या सभेत जाधव यांना नवीन वर्षाचे अंदाजपत्रक मांडू देणार नाही, असा इशाराही पक्षाच्यावतीने प्रशासनास देण्यात आला.गेल्या चार दिवसांपासून मुरलीधर जाधव यांचा बेटिंग व्यवसायाशी असलेल्या संबंधांची चर्चा होऊ लागली आहे. तसेच बेटिंग घेणाऱ्या ज्या पंटरांना पोलिसांनी अटक केली त्यांनीही जाधव यांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे; म्हणूनच जाधव यांनी राजीनामा द्यावा किंवा प्रशासनाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मनपासमोर झालेल्या सभेत जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी जाधव यांच्यावर टीका करत प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले. महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी जाधव यांना महापालिकेचा अर्थसंकल्प मांडू देणार नाही, असा इशारा दिला. बेटिंगमध्ये नाव आल्यामुळे स्थायी समिती सभापतिपद तसेच कोल्हापूरचे नाव बदनाम होत आहे, त्यामुळेच मनाची लाज राखून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही देसाई यांनी यावेळी केली. त्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ उपायुक्त विजय खोराटे यांना भेटले. मुरलीधर जाधव यांचे बेटिंग व्यवसायाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी देसाई यांनी उपायुक्तांकडे केली. शिष्टमंडळात नगरसेवक अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे, अ‍ॅड. संपतराव पवार, हर्षद कुंभोजकर, तौफीक बागवान, सुरेश जरग, कविता पाटील, रेखा वालावलकर, विजयमाला देसाई, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)