शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई

By admin | Updated: September 26, 2016 00:55 IST

महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई

तानाजी पोवार ल्ल कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील नेत्यांतील टोकाचा संघर्ष आता महापालिकेतील दोन्हीही आघाड्यांतून दिसून येत आहे. आघाडी नेत्यांनी ‘कारभाऱ्यां’ना फूस लावणे सोडून त्यांना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा लवकरच दोन्हीही आघाडीत हे प्रकरण हातघाईवर येण्यास वेळ लागणार नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळपट्टीला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे. महापालिकेत शहराचा विकास करण्यासाठी पाठविलेल्या या नगरसेवकांकडून आता विकासापेक्षा कुरघोडीचे राजकारण केले जाऊ लागल्याने संपूर्ण शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे विकासकामांबाबत कोल्हापूर राज्यात पाठीमागे पडू लागले आहे. महापालिकेत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विकासकामांपेक्षा कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. राजकारणात महाडिक-पाटील यांच्यातील संघर्ष महापालिकेतील आघाड्यांतून बाहेर येऊ लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काठावर बहुमत घेऊन विराजमान असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीनेही राज्यातील सत्तेच्या जोरावर विकासनिधींचा सपाटा लावला आहे; पण नेत्यांतील राजकारणाचे पडसाद आता महापालिकेच्या आघाडीत उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांतील काही कारभाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबावतंत्र टाकून सुरू केलेल्या कार्यपद्धतीला विरोधी आघाडीने थेट विरोध करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत नगरसेवकांत टोकाच संघर्ष सुरू झाला आहे. या राजकीय संघर्षात काही अधिकाऱ्यांचीही पिळवणूक सुरू आहे. नगरसेवकांचा विकासकामांऐवजी कुरघोडीमध्येच वेळ जाऊ लागला आहे, त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर फेकण्यापासून, अपहरण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्याला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात दरी निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ही वेळ येत असल्याने कनिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांची अवस्था कल्पनेपलीकडे झाली आहे, त्यामुळे सेवानिवृत्ती, बदलीची अनेकांना घाई लागली आहे. दोन आघाड्यांतील वाद आता चांगलाच भडकला आहे. विकासकामांत कोल्हापूर पिछाडीवर वाद आणि आघाड्यांतील कुरघोडीमुळे ‘कारभारी’ प्रशासनावर दबाव टाकून आपली ‘काही’ कामे करून घेत आहेत. त्यातच दोन्हीही आघाडीतील वादामुळे शहराचा विकास खुंटत आहे. वर्षभरात एकही मोठे विकासकाम मंजूर झालेले नाही तर कचरा, वीज निर्मिती, कत्तलखाना, पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील जागेत व्यापारी संकुलवजा पार्किंग, पाणी योजना आदी कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे यापूर्वी मुंबई, पुणे पाठोपाठ कोल्हापूरचा विकासात नंबर लागत होता, पण आता विकासात नाशिक आणि औरंगाबादनेही कोल्हापूरला मागे टाकले आहे.