शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

मुमताज शेख यांना पारितोषिक

By admin | Updated: February 9, 2016 00:45 IST

गुरुवारी होणार वितरण : पाटगावकर कुटुंबीयांतर्फे पुरस्कार

कोल्हापूर : महाराष्ट्रात महिलांसाठी वेगळ्या वाटेने जाऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस दिले जाणारे ‘कुसुम’ पारितोषिक यंदा ‘राईट टू पी’ चळवळ उभारणाऱ्या मुंबईतील मुमताज शेख यांना सोमवारी जाहीर झाले. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. गुरुवारी (दि. ११) शाहू स्मारक भवनात ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होत आहे. अध्यक्षस्थानी बाबा मुळीक असतील. सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होईल.आंतरभारती शिक्षण मंडळ व दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगावकर यांच्या कुटुंबीयांतर्फे हे पारितोषिक गतवर्षीपासून देण्यात येत आहे. पाटगावकर यांनी आंतरभारती शिक्षण मंडळाकडे तीन लाख रुपयांची ठेव मृत्यूपश्चात ठेवली आहे. त्याच्या व्याजातून हे पारितोषिक देण्यात येते. पाटगावकर यांची हयात राष्ट्रसेवा दलाची विचारसरणी रुजविण्यात गेली. सामाजिक समतेसाठी विविध विषयांवर त्यांनी शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने दिली. त्यांच्या पत्नी कुसुम या प्राध्यापक होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेली फॅमिली पेन्शन तीन लाख रुपये त्यांनी बाजूस ठेवली आणि त्यातूनच हे कुसुम पारितोषिक दिले जाते.मुमताज शेख यांचे काम वेगळ््या वाटेने जाणारे आहे. त्यांच्या कामाची सुरुवात महिलांतील साक्षरतेपासून झाली. दलित वस्तीतल्या महिलांना अक्षरांबरोबरच जगण्याचेही धडे त्या देऊ लागल्या. सध्या चेंबूर ट्रॉम्बे परिसरातील दहा हजार महिला फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यातून अनेक दलित व मुस्लिम महिलांना आत्मसन्मानाचा मार्ग मिळत आहे. वस्तीतील वयात येणाऱ्या मुलींसाठीही त्यांनी खूप मोठे काम केले आहे.‘राईट टू पी’ म्हणजे काय..?‘राईट टू पी’ म्हणजे मूत्रविसर्जनाचा अधिकार. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. कारण मूत्रविसर्जन ही स्वाभाविक क्रिया आहे. मग याचा अधिकार कसला असे वाटेल, पण आजही आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना मूत्रविसर्जनासाठी शौचालयांची व्यवस्थाच नाही. स्वातंत्र्यानंतर महिला मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आहेत; परंतु आजपर्यंत या नाजूक अडचणीबद्दल त्या संकोच बाजूला ठेवून बोलल्या नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन मुमताज यांनी ‘राईट टू पी’ही चळवळ सुरू केली.