शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मुंबईच्या तोतया वकील महिलेचा ग्राहकांना गंडा घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 03:12 IST

कोल्हापूर पोलिसांनी घेतले ताब्यात : फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : कर्ज देण्याच्या आमिषाने अनेकांकडून कडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या मुंबईतील तोयया वकील महिलेस शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी ती पळून जाण्याच्या प्रयत्नात होती.

भक्ती भास्कर सुर्वे (रा. मूळ कांदिवली पूर्व, सध्या रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे त्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिच्याकडून तिने कर्जदारांकडून घेतलेले कोरे धनादेश, कर्जदारांच्या फोटोसह महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली.

उच्च न्यायालयात वकील असल्याचे खोटे सांगून कोल्हापुरातील कसबा बावड्यात महिन्यासाठी तिने घर भाड्याने घेतले. त्या घराबाहेर कर्जे मिळवून देण्याबाबत संस्था काढून फलक लावला. कागदपत्रे व धनादेश जमा करण्यासाठी काही तरुणांची नियुक्ती केली. प्रारंभी तिने कर्जासाठी कागदपत्रे, स्वाक्षरी केलेले दहा धनादेश घेतले. कर्जमंजुरीच्या नावाखाली खोटे धनादेश देऊन लाखाला २० हजार याप्रमाणे कमिशन घेऊन ती पळून जाण्याच्या तयारीत होती. तिने कामावर ठेवलेल्या तरुणांना याबाबत शंका आली. त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

जिल्हा न्यायालयातही तिचा वावरभक्ती हिने वकील असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते. वकिलासारखी वेशभूषा करून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तिचा वावर होता. तिने १२ मेपासून मुंबईतील ‘सुधीर’ नावाच्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या फर्मची वकील असल्याचे भासविण्यास सुरुवात केली. त्याद्वारे तिने अ‍ॅडव्होकेट सुधीर नावाने जाहिरात फलक छापून घेतला. संस्थेमार्फत व्यवसायासाठी व पर्सनल एक ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळवून देऊ, असे सांगण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Courtन्यायालय