शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आर.सी.एफ. अंतिम फेरीत

By admin | Updated: April 9, 2016 00:56 IST

व्ही.आय.पी. चषक क्रिकेट

कोल्हापूर : फायटर्स स्पोर्टस् क्लब आयोजित व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात आर. सी. एफ. (मुंबई) संघाने हुंडेकरी स्पोर्टस्चा ७ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरी, तर पुण्याच्या प्रथम स्पोर्टस्ने पॅकर्स स्पोर्टस्चा २८३ धावांनी पराभव करीत पुढील फेरी गाठली. शास्त्रीनगर मैदानावर आर.सी.एफ. व हुंडेकरी स्पोर्टस् यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना हुंडेकरी संघाने ३४.४ षटकांत सर्वबाद १२९ धावा केल्या. यामध्ये अजिम काझीने ३३, मुर्तझा ट्रंकवालाने १५, आशिष देशमुखने १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर.सी.एफ.कडून भारतसिंगने ४, अंकुरसिंगने ३, तर विजय पावसेने २ व सुनील चावरे याने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना आर.सी.एफ.ने २२.५ षटकांत ३ बाद १३२ धावा काढून अंतिम फेरी गाठली. यामध्ये सुनील चावरेने नाबाद ४०, तरनजितसिंग धिलॉनने ३३, तर रवी सोळंकीने नाबाद ३२ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये हुंडेकरी संघाकडून अरिफ शेख, अजिम काझी, अभी दुधे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना येथे प्रथम स्पोर्टस् (पुणे) व पॅकर्स क्लब यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रथम स्पोर्टस्ने ४० षटकांत ६ बाद ४४७ धावांचा डोंगर रचला. यामध्ये वृषभ राठोडने ६३ चेंडूंत नाबाद १५८, तर यश नहारनेही त्यास साथ देत ५१ चेंडूंत ११४ धावा केल्या, तर शुभम रांजणे व अमेय सोमण यांनी प्रत्येकी ४६ धावा करीत आपल्या संघाची धावसंख्या ४४७ अशी विशाल केली. ‘पॅकर्स’कडून हर्षल बोरसेने २, तर मनोज लोखंडे, सौरभ श्रींगारे, अनिल पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २७ षटकांत १६४ धावांत गुंडाळला. यामध्ये अनिल पाटीलने नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्यास सचिन उपाध्येने २३ व देवेश वराडेने ३४ धावा काढून मोलाची साथ दिली. मात्र, मोठ्या धावसंख्येने होणारा पराभव हे फलंदाज रोखू शकले नाहीत. प्रथम संघाकडून रुपेश पोपेता याने तीन, तर विजय कोहली, हितेश वलुनी, अमेय सोमण, महेश शिंदे, यश नहार, वृषभ राठोड यांनी प्रत्येकी एक बळी घेत पॅकर्सचा संघ १६४ धावांत गारद करीत तब्बल २८३ धावांनी मात केली. सामनावीर म्हणून वृषभ राठोडला गौरविण्यात आले.