शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

मुंबईतील दिग्गज आज भरणार अर्ज

By admin | Updated: April 1, 2016 01:30 IST

चित्रपट महामंडळ निवडणूक : दीपाली सय्यद, बिडकर, बारगीर यांच्यासह ३४ जणांचे अर्ज

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची जशी शेवटची तारीख जवळ येईल, तशी रंगत वाढू लागली आहे. अर्ज भरण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर, माजी अध्यक्ष विजय कोंडके यांच्यासह दिग्गज अर्ज भरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गुरुवारी विद्यमान संचालक सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह ३४ अर्ज दाखल केले. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी विद्यमान संचालक बारगीर, बिडकर व अभिनेत्री दीपाली सय्यद, इम्फाचे संचालक बाळासाहेब गोरे, अ‍ॅड. मोहन पिंपळे यांच्यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून ३४ अर्ज दाखल झाले असून एकूण ४९ जणांनी निवडणुकीच्या रिंगणात अर्ज भरून उडी घेतली आहे. त्यामुळे आज विद्यमान अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, निर्माते, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, महेश मांजरेकर, अमेय खोपकर, आदी दिग्गजांचे अर्ज दाखल होणार आहेत. यात सूचकांमार्फतही काही मंडळी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. विक्रमी संख्येने अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. आजअखेर ४९ अर्ज, तर शेवटच्या अंतिम दिवशी किमान ७५ ते ८० अर्ज दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिन्ही केंद्रांतून १७५ हून अधिक अर्जांची विक्री झाली आहे. कृती समितीच्या दाव्याचा निकाल उद्या ?अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीने दाखल केलेल्या न्यायालयीन दाव्यांमध्ये गुरुवारी न्यायालयाने महामंडळ व कृती समितीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे पुढील सुनावणी उद्या, शनिवारी होणार आहे. या सुनावणीत निकाल लागण्याची शक्यता रंगकर्र्मींकडून व्यक्त होत आहे.पाच पॅनेल होणार ?मुंबईतून विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर, विजय कोंडके, अ‍ॅड. मोहन पिंपळे, प्रसाद सुर्वे आणि कोल्हापुरातील स्थानिक रंगकर्मीचे असे एकूण ५ पॅनेल आणि स्वतंत्र अपक्ष म्हणून लढविणाऱ्यांची संख्या लक्षात घेता विक्रमी मतपत्रिका होण्याची चिन्हे आहेत. विजय कोंडके यांचे पॅनेल गुरुवारी रात्री माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विजय कोंडके यांनी आपले पॅनेल जाहीर केले. विजय कोंडके (निर्माता), गजेंद्र अहिरे (दिग्दर्शक), संजय पवार (लेखक), संजीव भंडार (वितरण, प्रदर्शन), मिलिंद गवळी, संदीप नंदू होनप, (अभिनेता), अभिनेत्री पूजा पवार (अभिनेत्री गट), वासू पाटील (कला), चंद्रशेखर अय्यर (छायाचित्रण), सुरेंद्र केतकर (संकलन), महादेव दळवी (रंगभूषा, वेशभूषा), अशोक जाधव (निर्मिती व्यवस्था), प्रकाश निकम (ध्वनिलेखक), मधू पाटील (कामगार).