शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले

By admin | Updated: March 1, 2015 00:36 IST

पानसरे हत्या प्रकरण : तपासाबाबत गोपनीयता

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापुरात तळ ठोकून बसलेले मुंबई क्राईम ब्रँचचे पथक अखेर धागेदोरे न मिळाल्याने रिकाम्या हाताने मुंबईला परतले. आतापर्यंत हाती लागलेल्या माहितीची कोल्हापूर पोलीस अतिशय बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या खात्री करीत आहेत. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी सुरुवातीपासून तपासाबाबत गोपनीयता पाळली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबने केलेल्या तपासणीत पानसरे व त्यांच्या पत्नीवर मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे उघड झाले आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना प्राप्त झाला नसल्याचे तपास अधिकारी अंकित गोयल यांनी सांगितले. पानसरे यांच्यावरील हत्येच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचजणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून माहिती घेतली. रुग्णालयामध्येही जाऊन त्यांनी पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्यांनी तपासाला सुरुवात केली. सलग आठ दिवस हे पथक कोल्हापुरात तळ ठोकून होते. या कालावधीत कोणतेच धागेदोरे हाती न लागल्याने ते माघारी मुंबईला परतले. पानसरे यांच्या नातेवाइकांसह त्यांच्या घराशेजारील लोक, सामाजिक, राजकीय संस्थांचे कार्यकर्ते अशा सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांचे जबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. पुणे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष येऊन पंचनामा केला होता. त्या अहवालात मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना मिळालेला नाही.