शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बंगलोर कॉरिडॉर प्रश्नी उद्योजक शांत का?

By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST

सतेज पाटील यांची विचारणा : कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत

कोल्हापूर : मुंबई - बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा येथील विकासाला मोठा फटका बसणार आहे. आम्ही सत्तेत असताना वीज दरवाढीच्या मुद्द्यावरून लढा उभारणारे कोल्हापूरचे उद्योजक हे कॉरिडॉरच्या प्रश्नाबाबत आता का शांत बसले आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. या कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी या कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यातील विजेचे दर अधिक असल्याच्या कारणावरून आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरच्या उद्योजकांनी लढा उभारला. सकारात्मक निर्णयासाठी मी स्वत: त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती; पण यानंतर नवे सरकार आले. सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी विजेचे दर काही कमी झालेले नाहीत. यातच आता भाजप सरकारने मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. त्याचा येथील औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत मी आवाज उठविला; पण, अजूनही जिल्ह्णातील एकाही औद्योगिक संघटनेने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. शिवाय या संघटनेचे कोणतेही पदाधिकारी मला या प्रश्नाबाबत भेटायला आले नाहीत. औद्योगिक विकासाला मारक ठरणारा निर्णय असूनही उद्योजक अजूनही का शांत आहेत, हा मला प्रश्न पडला आहे. कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. पण व्यापारी, उद्योजक, आदी सर्व घटकांनी सामूहिकपणे आवाज उठवून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले,‘या निर्णयाचा फटका कोल्हापूरच्या विकासावर दूरगामी होणार आहे. विकासाच्या सगळ््या प्रक्रियेतून कोल्हापूर बाजूला पडेल. कोल्हापूरला वगळले जाते आणि त्याचवेळेला सांगली,साताऱ्याचा समावेश केला जातो. कोल्हापूरात जागा उपलब्ध नाहीत असे तकलादू कारण दिले जाते. परंतू कोल्हापूरात अगोदरच चांगले औद्योगिक जाळे तयार झाले आहे. कॉरिडॉरमध्ये समावेश झाल्यास विमानतळ, रेल्वे सेवेचे विस्तारीकरण होईल. देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शहराला महत्व येईल. अगोदरच आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला नाही. आता कॉरिडॉरमधूनही बाजूला गेल्यास होणारे परिणाम गंभीर असतील. म्हणून सर्वच घटकांना त्याचे गांभीर्य वाटले पाहिजे.’ महानगरपालिकेचे मोबाईल अ‍ॅप आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार कोल्हापूरच्या विकासाला बळ देणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शहरवासीयांना पाणी, रस्ते, आदी स्वरूपांतील चांगल्या सुविधा दिल्या जातील. याअंतर्गत लवकरच महापालिकेचे मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातील.(प्रतिनिधी)