युनियनचे राज्य अध्यक्ष सतीश सर्वगाेडे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या गट ‘क’ आणि ‘ड’ वर्ग परीक्षा ऐनवेळी शनिवारी रात्री रद्द करण्यात आल्या. नर्सिंग क्षेत्रावर पूर्वीपासून चालत आलेल्या अन्यायात आणखी एक कडी जोडली आहे. आज अनेक नर्सेस परीक्षेसाठी प्रवासात आहेत, अनेकांनी तिकीट बुकिंग केले आहेत अशावेळी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे आणि त्याचा संघटना निषेध करते.
राज्य सचिव डेव्हिड लोखंडे म्हणाले, नर्सिंगच्या सर्व जागांची भरती करून घेण्यासाठी खासगी कंपनीला दिलेली जबाबदारी रद्द करावी आणि एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा व्हाव्यात. पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी तेजस कागवाडे म्हणाले, शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मुंबई मध्ये मंत्रालयाच्या दारात आवाज उठविणार आहोत. उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता मंत्रालयाच्या दारात हे आंदोलन होणार आहे. सर्व नर्सेसनी यावेळी उपस्थित राहावे. यावेळी कॉ. सुवर्णा तळेकर, रफेल गायकवाड, अर्पिता पाटील, अभिजित हुपरीकर, अमोल देसाई, अनिकेत गायकवाड, नीलेश बंडवळ, विपूल गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची यंत्रणा होती तयार
जरी खासगी कंपनीच्यावतीने परीक्षा घेतल्या जाणार असल्या तरी त्या आरोग्य विभागाच्या असल्याने ४६ वैद्यकीय अधिकारी सर्व केंद्रावर तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली होती. कोविडविषयक सूचनांचे पालन होते की नाही इथंपासून लेखनिक देण्यापर्यंतची सर्व यंत्रणा सज्ज होती अशी माहिती प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले.
कोट
शनिवारी होणारी आरोग्य भरती परीक्षा ऐनवेळी रद्द शासनाने विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. अनेक विद्यार्थी प्रवास करून केंद्रांवर पोहोचले आहेत. त्यांना भरपाई देणार आहात का. विरोध असतानाही भरती प्रक्रियेसाठी बोगस कंपन्या नेमून शासनाला नेमके हेच साध्य करायचे होते का...
समरजित घाटगे
कोल्हापूर जिल्हा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष
२५०९२०२१ कोल नर्सिंग फेडरेशन
आरोग्य विभागाने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याच्या निषेर्धात महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सिंग युनियनच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने करण्यात आली.