शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

मल्टिस्टेट विरोधकांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेटबाबत विरोधी गटाने सहकार न्यायालयात दाखल केलेली याचिका सहकार न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश आर. एन. दांडगे यांनी बुधवारी फेटाळली. मल्टिस्टेटबाबतचा ठराव करू नये, अशी सहकार कायद्यात तरतूद नाही. तर जागा व ठरावावरील मतदानाबाबत अधिकार संस्थेला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेटबाबत विरोधी गटाने सहकार न्यायालयात दाखल केलेली याचिका सहकार न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश आर. एन. दांडगे यांनी बुधवारी फेटाळली. मल्टिस्टेटबाबतचा ठराव करू नये, अशी सहकार कायद्यात तरतूद नाही. तर जागा व ठरावावरील मतदानाबाबत अधिकार संस्थेला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाने मल्टिस्टेटचा विषय पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याला विरोधी गटाच्या विठ्ठलाई दूध संस्था सरवडे, हनुमान दूध संस्था शिरोली दुमाला, हनुमान दूध संस्था गाडेगोंडवाडी यांनी याचिका दाखल केली होती.न्यायालयाने ‘गोकुळ’चे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सभेपुढे मल्टिस्टेटचा विषय ठेवण्याचा अधिकार कायद्याने संस्थेला दिलेला आहे. सभा कोठे घ्यायची याचा अधिकारही संस्थेला असून, एखाद्या विषयावर सभेत आवाजी की गुप्त पद्धतीने मतदान घ्यायचे, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी सभाध्यक्षांना असल्याचे सांगत विरोधी गटाची याचिका फेटाळून लावली. सहकार न्यायालय क्रमांक १चे न्यायाधीश आर. एन. दांडगे यांनी याचिका फेटाळत असताना सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे आदेशही न्यायालयाने सत्तारूढ गटाला दिले आहेत.गुप्त मतदान घ्यावे लागेल : विरोधी वकिलांची माहितीयाचिका फेटाळली नसून अंतरिम अर्ज फेटाळला असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली. सभासदाचे एखाद्या विषयावर मतभेद असतील, तर मतदान घेता येते. न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत की, सभासदांनी गुप्त मतदानाची मागणी केल्यास ते तसे घ्यावे, व सहकार कायद्यातील कलम ६० मध्ये जी तरतूद आहे त्याचे काटेकोर पालन व्हावे त्यानुसार ‘गोकुळ’च्या सभेत सभासदाने गुप्त मतदानाची मागणी केल्यास अध्यक्षांना त्याचे पालन करावे लागेल, अशी माहिती विरोधी बाजूचे वकील अ‍ॅड. के. डी. पवार, अ‍ॅड. प्रबोध पाटील, अ‍ॅड. नेताजी पाटील यांनी पत्रकातून दिली.विरोधक उच्च न्यायालयात?मल्टिस्टेटचा विषय सभेत सुटणार नसल्याने तो न्यायालयातच जाणार आहे. सहकार न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विरोधक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.