शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीचा आजऱ्यात ग्राहकांना ‘शॉक’

By admin | Updated: July 10, 2017 23:28 IST

अनागोंदी कारभार थांबणार तरी कधी ? : घरगुती वापराचे एका महिन्याचे वीज बिल ८४९० रुपये

कृष्णा सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क--पेरणोली : आजऱ्यातील महावितरणच्या शाखेच्या सातत्याने येणाऱ्या कृषिपंप व घरगुती बिलाच्या भरमसाट वाढीव बिलाला ग्राहक कंटाळला असून, या शाखेचा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनागोंदी कारभार थांबणार तरी कधी, अशी विचारणा तालुक्यातील ग्राहकांमधून होत आहे.अनेक वर्षांपासून महावितरणच्या वीज बिलामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. अनेकदा वीज ग्राहकांनी तक्रार करूनही त्याचे निरसन झालेले नाही. तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पुन्हा भरमसाट बिल येते. ही परिस्थिती तालुक्यात सर्वत्र असल्याने ग्राहकांमधून आजरा महावितरणच्या शाखेच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.हरपवडे येथील धनाजी पाटील यांचे महिन्याचे घरगुती बिल सर्वसाधारण येते. मात्र, गेल्या महिन्यात एका महिन्याचे बिल ८४९० रुपये आल्याने पाटील यांनी आजरा येथील महावितरण शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, तक्रार करूनही तुमचे बिल जेवढे आहे तेवढेच भरावे लागणार असल्याची दमदाटीही दिल्याने पाटील घरी परतले. पत्नी सरपंच असलेल्या घराला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.कृषिपंपाचे वीज बिलही अ‍ॅव्हरेजनुसार काढण्यात येत आहे. रीडिंगप्रमाणे बिल आकारल्यामुळे तीन एचपीच्या ग्राहकाला पाच ते सात एचपीच्या कृषिपंपाएवढे वीज बिल येत आहे. त्यामुळे कृषिपंपाचीही भरमसाट बिले येत असल्याने रीडिंगप्रमाणे वीज बिल आकारण्याची मागणी होत आहे.घरगुती बिल ८४९० रुपये आल्याने मीटर दुरुस्तीसाठी कार्यालयात गेलो असता मलाच उलट प्रश्न विचारण्यात आले. सर्वसामान्यांना कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे व वागणूक दिली जात नाही.- धनाजी पाटील, घरगुती वीजग्राहककृषिपंपाचे वीज बिल अ‍ॅव्हरेजनुसार काढण्यात येत असल्याने छोट्या शेतकऱ्यांना विनाकारण भरमसाट बिल भरावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही निवारण झालेले नाही.- अजित सावंत, कृषिपंप ग्राहक, आजरा.