शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने तोडली ३२ गावांची वीज

By admin | Updated: October 4, 2015 00:35 IST

थकबाकीसाठी कारवाई : पाणीपुरवठ्याची पावणेपाच कोटींची थकबाकी

राजाराम लोंढे / कोल्हापूर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या पावणेपाच कोटींच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने ३२ गावांतील वीजजोडण्या तोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे. जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजना थकीत असून कोल्हापूर ग्रामीण भाग २ मधील गावांचा सर्वाधिक समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग हा ग्रामपंचायतींची डोकेदुखी ठरू लागला आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीपुरवठ्याची बिले भरमसाट येऊ लागली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांपासून दीड लाखापर्यंत महिन्याला विजेचे बिल येत असल्याने ग्रामपंचायतींचा ताळेबंद कोलमडला आहे. आॅगस्ट २०१५ अखेर जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ७१ लाख १८ हजारांची थकबाकी आहे. गडहिंग्लज विभागातील २३६ योजनांकडे ७२ लाख ६० हजार थकबाकीपैकी २१ योजनांनी १ लाख रुपये भरले आहेत. कोल्हापूर ग्रामीण १ विभागाकडील २९४ योजनांकडे १ कोटी १४ लाखांपैकी ४३ योजनांनी ४ लाख १७ हजार रुपये भरले आहेत. उर्वरित ग्रामीण २ कडील ३२९ योजनांकडे २ कोटी ७८ लाख, जयसिंगपूर विभागातील १०१ योजनांकडे ६७ लाख ६७ हजार, इचलकरंजीमधील ६७ योजनांकडे ८ लाख १० हजार, कोल्हापूर शहर विभागाकडील १७ योजनांकडे ९४ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ग्रामपंचायतींना नोटिसा काढूनही बिल भरले नसल्याने महावितरणने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जयसिंगपूर विभागातील एक, तर कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ अशा ३२ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.