शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

खासदारांनी मंत्र्यांना धरले धारेवर

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

लोकसभेत महाडिक आक्रमक : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील आज, बुधवारी झालेल्या कामकाजावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. सर्व शिक्षण अभियान अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणदेऊन अनेक सुविधाही दिल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्यास तसेच क्रीडांगण उभारण्यास निधी दिला जात नाही याकडे लक्ष वेधून महाडिक यांनी मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुषवाह यांना जाब विचारला. यावेळी महाडिक आक्रमक झाले होते.धनंजय महाडिक यांनी मंत्री कुषवाह यांना पुरवणी पत्रिकेद्वारे संसद सभागृहात प्रश्न विचारले, तेव्हा कॉँग्रेस, जनता दल, तृणमूल कॉँग्रेससह विरोधी बाकावरील सर्वच खासदारांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. ‘पढे भारत - बढे भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पुरेशी शिक्षक भरती झाली आहे का, असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला. देशातील मुलांना मोफत शिक्षणासोबत करोडो रुपये खर्च करून सुविधा दिल्या जातात; पण शाळांना संरक्षक भिंत बांधण्यास व क्रीडांगण विकसित करण्यास निधी दिला जात नाही, त्यामुळे मुलांची सुरक्षितता धोक्यात येते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी मंत्री कुषवाह यांनी शिक्षकांची कमतरता असल्याचे मान्य करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आणि भविष्य आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खेळांच्या माध्यमातून सशक्त पिढी घडविण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना आखणार, असा प्रश्न महाडिक यांनी विचारला. त्यावेळी महाडिक यांच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल सभागृहाचे समाधान झाले नाही. त्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. ( प्रतिनिधी )