शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

‘वाल्मीकी म्हेत्तर’ची परिवर्तनाकडे वाटचाल

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

छत्रपती राजाराम महाराजांकडून आश्रय : जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देत नवनिर्मितीसाठी धडपड

राजाराम लोंढे - कोल्हापूर -पिढ्यान्पिढ्या साफसफाई करणारा कोल्हापूरचा ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. पारंपरिक काम करताना प्रबोधनातून समाजाला शिक्षणप्रवाहात आणले जात आहे. मागासलेपणाचा डाग शिक्षणातूनच पुसला जाऊ शकतो, असा विश्वास या समाजाला आहे. सर्व सण, उत्सव अगदी आपलेपणाने साजरे करताना जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देण्याचे काम या समाजाने केल्याने खऱ्या अर्थाने या समाजाची नवनिर्मितीसाठी धडपड सुरू आहे. ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज हा मूळचा जयपूर, राजस्थानमधील आहे. पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने हा समाज राजस्थानमधून पंढरपुरात आला. तिथे राहून तो साफसफाईचे काम करू लागला. कोल्हापुरात प्लेगची साथ आल्यानंतर येथील सफाई कामगारांनी मैला सफाईच्या कामाला नकार दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी साफसफाईसाठी या समाजातील काही लोकांना कोल्हापुरात आणले. लक्ष्मीपुरी येथे त्यांना जागा देऊन कायमस्वरूपी निवारा दिला. तेव्हापासून हा समाज जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. कोल्हापूर शहरात संभाजीनगर, लाईन बझारासह जिल्ह्यात साधारणत: वीस हजार लोकसंख्या या समाजाची आहे. या समाजाच्या वतीने वर्षभरात धर्मगुरू महर्षी नवल यांची जयंती, वाल्मीकी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. श्रावण महिन्यात भगवानवीर गोगादेव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. संभाजीनगर येथील समाजमंदिरात सासनकाठी उभारली जाते. समाजातील तरुण श्रावणातील २१ दिवस कडक उपवास करतात. या काळात समाजातील चाळीस ते पन्नास तरुण दाढी करीत नाहीत, पायांत चपला वापरत नाहीत, महिलांनी शिजविलेले जेवण खात नाहीत. दिवसभर ते पूजा, भजन, कीर्तनात रंगून जातात. शेवटच्या दिवशी सासनकाठीसह मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील समाज सहभागी होतो. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. समाजात लग्न ठरविताना हुंडा मागितला अथवा दिलाही जात नाही. हुंडामागणीचा प्रकार कोठे होत असेल तर लगेच म्हेत्तर सकल पंचायतीच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले जातात. काही कारणाने कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला तर तो सकल पंचायतीच्या माध्यमातून लगेच मिटविला जातो. अपघाताने एखाद्या महिलेला विधवा होण्याची वेळ आली तर तिच्या इच्छेनुसार पुनर्विवाह करून दिला जातो. म्हेत्तर समाजातील यासह इतर परंपरा अन्य समाजाच्या दृष्टीने आदर्शवत मानल्या जातात.कोल्हापूर जिल्हा म्हेत्तर सकल पंचायत कार्यकारिणीके. पी. पचरवाल, राजू चंडाले, सुरेश आदिवाल, जयवंत गोडाळे, रामस्वरूप पटोणे, शिवाजी पटोणे, खैराती ढढोरे, सुभाष खरारे, राजू सांगरे, विजय कराले, सुनील लोट.एकही उच्चशिक्षित नाहीसमाजातील तरुणांनी पारंपरिक सफाईच्या कामाशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष न दिल्याने समाजात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आला आहे. परिणामी एकही इंजिनिअर, वकील, आदी उच्च शिक्षण घेतलेला तरुण नाही; पण सध्या समाजात बऱ्यापैकी जागृती झाल्याने शिक्षणाबाबतचे मन परिवर्तन होण्यास मदत झाली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत!शासनाकडून भ्रूणहत्येबाबत प्रबोधन व जागृती सुरू आहे; पण ‘वाल्मीकी’ समाजात गेल्या अनेक वर्षांपासून मुलगीचा जन्म शुभ मानला जातो. मुलगी झाली की तिचे स्वागत केले जाते. दाखल्यासाठी अडचणींचा डोंगरआर्थिक टंचाईमुळे मुळात हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात जाऊ पाहत आहे. त्यासाठी त्यांना जातीच्या दाखल्यांची गरज आहे. हा समाज ‘अनुसूचित जाती’ या प्रवर्गात येतो; पण दाखल्यासाठी १९५० पूर्वीचा रहिवासी असल्याचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड लागते. अद्याप ८० टक्के समाज महापालिकेच्या मालकीच्या व भाड्याच्या खोल्यांत राहत असल्याने दाखल्याबाबत तो काहीच पुरावे देऊ शकत नाही.