शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

‘राजाराम’ची निवडणूक घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात कोल्हापूर मनपा व त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. तत्पूर्वी ‘राजाराम’ची निवडणूक घेण्यासाठी विरोधी आघाडी प्रयत्नशील आहे. कराडच्या ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या धर्तीवर न्यायालयात जाऊन जुलैपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल, का याची चाचपणी सुरू आहे.

विधानपरिषद, लोकसभा, विधानसभेनंतर ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली हाेती. ‘गोकुळ’मध्ये त्यांनी मोट बांधून तेही पदरात पाडून घेतले. ‘गोकुळ’ची बांधणी करताना ‘राजाराम’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नेत्यांना सोबत ठेवण्याची मुत्सद्दीगिरी त्यांनी दाखवून दिली. ‘गोकुळ’मधील नेत्यांची मोट ‘राजाराम’मध्ये पुढे कायम ठेवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी मंत्री पाटील यांचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे राज्य शासनाने ऑगस्ट २०२१ पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक घ्यायच्या झाल्यास न्यायालयातूनच यावे लागणार आहे. ‘कृष्णा’ कारखान्याचे ४६ हजार सभासद आहेत, त्याच पार्श्वभूमीवर ‘राजाराम’ची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करायची आणि जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

वाढीव सभासदांचा विषय न्यायालयात प्रलंबित

‘राजाराम’च्या १३४६ वाढीव सभासदाचा वाद उच्च न्यायालयात आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक (साखर) व सहकार मंत्र्यांनी हे सभासद रद्द केले आहेत. त्याविरोधात सत्तारूढ गटाने याचिका दाखल करत वाढीव सभासदांचा निकाल होईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली. मात्र ही याचिका अद्याप प्रलंबित आहे.

माने यांच्या राजीनाम्याने निवडणुकीचे संकेत

‘राजाराम’चे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीच्या चर्चेला पुन्हा जाेर धरला आहे. निवडणूक कधीही लागू शकते, ऐन निवडणुकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दुसरा विचार केला तर तो सभासदांच्या पचनी पडणार नाही, यासाठीच निवडणुकीचा अंदाज घेऊनच माने यांनी राजीनामा दिल्याची सध्या चर्चा आहे.

सत्तारूढ गटाकडून साधव हालचाली

‘गोकुळ’ची सत्ता हातातून गेल्यानंतर महादेवराव महाडीक यांनी ‘राजाराम’बाबत फार सावध हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी विविध कारणाने नाराजी झालेल्या जुन्या मंडळींना सोबत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावनिहाय सभासदांशी संपर्कावर त्यांनी भर दिला आहे.

दृष्टिक्षेपात ‘राजाराम’- कार्यक्षेत्र - हातकणंगले, करवीर, राधानगरी, गगनबावडा, कागल, पन्हाळा, शाहूवाडी.

गावे - १२२

सभासद- ‘अ’ वर्ग : १७३०२

‘ब’ वर्ग सहकारी संस्था : १४३

ऊस गाळप- ४ लाख १० हजार ८८८ टन

संचालक संख्या - १८, तज्ज्ञ संचालक -२, कार्यलक्षी संचालक-१.

सत्ता - तीस वर्षे महादेवराव महाडीक यांची एकहाती सत्ता