शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी हालचाली गतिमान

By admin | Updated: August 5, 2014 23:39 IST

काँग्रेसच्या आढावा बैठका : भाजपकडून आघाडीसाठी प्रयत्न

राजाराम पाटील - इचलकरंजी - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांकडून राजकीय हालचाली सुरू आहेत. कॉँग्रेस पक्षाकडून वॉर्डनिहाय बैठका घेतल्या जात असून, भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसमधील आवाडे विरोधकांची मोट बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह तिसऱ्या आघाडीत शांतता आहे.लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेसला हार पत्करावी लागली. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुद्धा कॉँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यापेक्षा महायुतीचे खासदार राजू शेट्टी यांना १९,८१२ मताधिक्य मिळाले. त्यामुळे इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीने गेले दोन आठवडे झाले कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या वॉर्डनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची स्थानिक कारणमीमांसा केली जात असून, त्याचा ऊहापोह या बैठकांतून होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवेळी आपापल्या वॉर्डांमध्ये मताधिक्य मिळविण्याविषयी पक्षश्रेष्ठींकडून या बैठकांमध्ये निर्देश दिले जात आहेत.अशा पार्श्वभूमीवर काल, सोमवारी शहर विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काही गट, राष्ट्रीय कॉँग्रेसमधील आवाडे विरोधक यांची येथील आमराई मळा येथे बैठक झाली. बैठकीस आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष बादशहा बागवान, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव, निमंत्रक तानाजी पोवार, सागर चाळके, शिक्षण मंडळाचे उपसभापती नितीन कोकणे, महेश बोहरा, शिवसेनेचे गटनेते महादेव गौड, राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, सुनील महाजन, उदय बुगड, दीपक ढेरे, नगरसेविका ध्रुवती दळवाई, लक्ष्मी बडे, आक्काताई कोटगी, सारिका धुत्रे, संतोष शेळके, मदन झोरे, शीतल दत्तवाडे, सुरेश भुत्ते, वसंत माळी, दिलीप मुथा, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये शहर व मतदारसंघातील राजकीय क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना आपल्या प्रमुख भाषणात आमदार हाळवणकर यांनी, विधानसभेसाठी त्यांच्या उमेदवारीला वीज चोरी प्रकरणाचा अडसर ठरणार नाही, अशी ग्वाही दिली. तेव्हा सर्वानुमते आमदार हाळवणकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला.याच बैठकीत हाळवणकर यांनी राष्ट्रवादीचे अशोक स्वामी, मदन कारंडे यांना भेटून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचेही निश्चित करण्यात आले. तसेच आगामी महायुतीच्या सरकारमध्ये शहर विकास आघाडीला शासनाचे महामंडळ मिळविण्याबाबत चर्चा करण्यात आली.एकास एक उमेदवार देण्याचा निर्धारराज्यात आणि नगरपालिकेत दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादीचे अशोक जांभळे व अशोक स्वामी वगळता अन्य स्थानिक नेते आवाडेंच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे आवाडे यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्धार सर्व विरोधकांचा असल्याचे स्पष्ट होते.