शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षींच्या पुतळ्यासाठी युद्धपातळीवर हालचाली

By admin | Updated: September 27, 2016 00:44 IST

वीस लाखांचा खर्च : पूर्णाकृती पुतळा उभारणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम तीनच महिन्यांत पूर्ण करायचे असल्याने याबाबतच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत इमारतीच्या दर्शनी भागात अर्धपुतळा बसविण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, नंतर पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाच्या प्रांगणामध्ये महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या पूर्ततेसाठीही कंबर कसली आहे. याच्या नियोजनासाठी सोमवारी दुपारी बैठकही झाली. जिल्हा परिषदेच्या २0 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत आपण काम करत असतानाही जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही त्यांचा पुतळा नसल्याची खंत व्यक्त करत या सभागृहाची मुदत संपण्याआधी हा पुतळा बसविण्याची घोषणा करत आपली देणगीही जाहीर केली होती. यानंतर काही सदस्य आणि अधिकाऱ्यांनीही देणग्या जाहीर केल्या. मात्र, नंतर पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत हा पुतळा जिल्हा परिषदेच्या इमारतीत दर्शनी भागात आणि तोही अर्धपुतळा बसविण्यापेक्षा तो ध्वजारोहणाच्या जागेसमोर पूर्णाकृती पुतळा उभारावा, यावर एकमत झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी समिती सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक झाली. उपाध्यक्ष शशिकांत खोत, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. या बैठकीत या पुतळ्यासाठीच्या वेगवेगळ्या खात्यांचे ना हरकत दाखले आवश्यक आहेत, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यासाठी अनुकूलता दर्शवत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली असल्याने अन्य विभागांचे दाखले गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. देखभाल आणि सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेचे हमीपत्रही आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचे यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)खोत यांची एक लाख ११ हजारांची देणगीया पुतळ्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आपली देणगीही घोषित केली होती; परंतु नंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय झाल्याने खोत यांनी त्यासाठी आपली देणगीची रक्कम वाढवून आता एक लाख ११ हजार रुपये जाहीर केली आहे.