दिल्लीत गेल्या ८५ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि तिन्ही कृषी कायदे रद्दच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीने रेल्वे रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार या समितीचे कार्यकर्ते सकाळी अकराच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे पोहोचले. त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि कृषी कायदे रद्दच्या मागणीच्या अनुषंगाने घोषणा दिल्या. त्यानंतर रेल्वे रोखण्यासाठी ते स्थानकामध्ये प्रवेश करू लागले. त्यावर त्यांना रेल्वे आणि राज्य पोलिसांनी रोखले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात किसान समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक नामदेव गावडे, रवी जाधव, शंकर काटाळे, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, दिलदार मुजावर, बाळासाहेब पाटील, वसंतराव पाटील, नामदेवराव पाटील, बाबुराव कदम, शिवाजीराव जाधव, महेश लोहार, आदी सहभागी झाले.
फोटो (१८०२२०२१-कोल-किसन समिती आंदोलन ०१ व ०२) : तिन्ही कृषी कायदे रद्दच्या मागणीसाठी कोल्हापुरात गुरुवारी रेल रोको आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (छाया : राज मकानदार)