शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘कोल्हापूर दक्षिण’मधील खराब रस्ते नव्याने न केल्यास आंदोलन : शिवसेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:58 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील रस्ते खराब झाले आहेत; त्यामुळे जे ...

ठळक मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : अतिवृष्टी व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील रस्ते खराब झाले आहेत; त्यामुळे जे रस्ते मुदतपूर्व खराब झाले आहेत, ते संबंधित कंत्राटदाराकडून पुन्हा नव्याने लवकरात लवकर करावेत. तसेच जिथे गरज आहे, तिथे तत्काळ पॅचवर्क करावे. ही कामे आठवड्याभरात न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे देण्यात आला.

ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट दिली. या ठिकाणी कार्यकारी अभियंता सोनवणे व उपअभियंता धनंजय भोसले यांना निवेदन सादर करून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील खराब रस्त्यांबाबत विचारणा केली. या गावांमधील रस्त्यांची पाहणी करून जे रस्ते मुदतपूर्व खराब झाले आहेत किंवा जेथे पॅचवर्क करणे शक्य आहे, अशा रस्त्यांची यादी करावी. मुदतपूर्व खराब झालेले रस्ते संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने लवकरात लवकर करून घ्यावेत. तसेच त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ज्या ठिकाणी पॅचवर्क करणे शक्य आहे, तिथे तत्काळ पॅचवर्क करावे.

संबंधित कंत्राटदाराने कोणता रस्ता केला, त्याची मुदत किती होती व मुदतपूर्व खराब झाला असेल तर तुमच्या कार्यालयाकडून त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात मिळावा. या मागण्यांबाबत सात दिवसांत लेखी उत्तर मिळावे; अन्यथा आपल्याविरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.खराब रस्त्यांची ३० नोव्हेंबरपर्यंत डागडुजी केली जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी दिले. शिष्टमंडळात विनोद खोत, अवधूत साळोखे, रणजित कोंडेकर, अरुण अब्दागिरी, सरदार तिप्पे, शहाजी भोपळे, कैलास ढोबळे, शांताराम पाटील, प्रमोद भोसले, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षाShiv Senaशिवसेना