गट नं ९२५ /८अ १ ही सरकार हक्कातील जमीन शहरातील बेघर कुटुंबांना देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधून मिळावीत. अशी मागणी संघटनेने नगरपरिषदेकडे केली आहे. नगरपरिषदेने तसा ठरावही मंजूर करून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याबाबतचा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु कागदपत्रातील काही त्रुटी दूर करून व आवश्यक असलेले ना हरकत दाखले तसेच इतर काही अनुषंगिक कागदपत्रांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बराच वेळ लागत आहे. नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिरंगाईमुळे हा संकल्प वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. याबाबतची जाणीव झाल्याने नगरपरिषद कार्यालयासमोर प्रापंचिक साहित्य व चुली मांडून तेथेच जेवण करून संघटनेच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उदय कंगणे,संभाजी माळी,दिनकर कांबळे,हिरालाल कांबळे,तानाजी लोहार,रवींद्र कांबळे,अशोक बरगे,यशवंत सरवदे,जयश्री आवळे,शोभा तळेकर,सरस्वती रजपूत,कविता साळोखे, वैशाली कंगणे आदीं
फोटो ओळी-हुपरी (ता. हातकणंगले) येथील सरकार हक्कातील जमीन शहरातील बेघर कुटुंबांना देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधून मिळावीत. या मागणीसाठी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीने शुक्रवारी नगरपरिषदेच्या आवारातच चुली मांडून आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.