कोल्हापूर : वीटभट्ट्या आणि ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या येथील ‘अवनि’या संस्थेच्यावतीने आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसांत मागण्यांबाबत चर्चा करण्याकरिता सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले.मुलांच्या दप्तरांचे ओझे कमी करावे, त्यावर उपाययोजना करावी, ऊस तोडणी कामगार व वीटभट्ट्यांवरील स्थलांतरित मुलांना शाळेत पाठविण्यात यावे, ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांसाठी पाळणाघरे सुरू करावीत, वयात येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण (लैंगिक) सक्तीचे करावे, खासगी शाळेतील मुलांचे बदल टिपण्यासाठी समुपदेशक नेमावेत, धाब्यांचे सर्वेक्षण करून तेथील बालकामगारांची मुक्तता करावी, आदी मागण्यांसाठी ही धरणे धरण्यात आले. कचरावेचक महिलांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनाचे नेतृत्व अनुराधा भोसले, पुष्पा शिंदे, जैनुद्दीन पन्हाळकर, शरयू भोसले, साताप्पा मोहिते, आदी महिलांनी केले
‘अवनि’चे धरणे आंदोलन
By admin | Updated: November 21, 2014 00:55 IST