शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पर्यायी शिवाजी पुलासाठी आंदोलनाचा जोर

By admin | Updated: August 4, 2016 01:23 IST

पूल कालबाह्य : राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया; पुरातत्त्व खात्याचा बाऊ, शासनाने लोकांना धरले वेठीस

कोल्हापूर : महाड-पोलादपूर रस्त्यावरील जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील ब्रिटिशकालीन १३८ वर्षांच्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या जुन्या शिवाजी पुलाला नव्या पर्यायी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना तो शासनाच्या लाल फितीत अडकला. त्यामुळे पुलाचे काम अर्धवट राहिले. वादग्रस्त ठरलेल्या नव्या पर्यायी पुलाच्या कामाबाबत कोल्हापुरातून राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, काही पक्षांनी आंदोलनाची तयारी केली आहे.ऐतिहासिक शिवाजी पुलाला पर्यायी असणाऱ्या पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ववत सुरू करावे यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीने विविध आंदोलने केली; पण केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून या पुलाच्या बांधकामाला स्थगिती मिळाल्याने या पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊनही रखडले आहे. महाड येथे ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातीलही जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामांबाबत आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या नेत्यांची आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली आहे.या शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ आज, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साळोखे यांची भेट घेणार आहेत.तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पर्यायी शिवाजी पुलासाठी आज, गुरुवारी दुपारी चार वाजता मध्यवर्ती बसस्थानक चौकात निदर्शने होणार आहेत. शहरातील पर्यायी शिवाजी पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा; अन्यथा ऐतिहासिक शिवाजी पुलाबाबत भविष्यात महाडप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे निवेदन महापालिकेतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी तौफिकअहमद मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. यावेळी नगरसेवक संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, उमा बनछोडे, सुभाष बुचडे, मोहन सालपे, इंद्रजित बोंद्रे, आदी उपस्थित होते. पर्यायी शिवाजी पुलाबाबत पुरातत्त्व खात्याचा बाऊ करून शासनाने लोकांना वेठीस धरले आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी राज्य शासनाने पर्यायी पुलाच्या पुढील कामास मंजुरी द्यावी, अशी मागणी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)