बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या वाढीव फीसंदर्भात शिवसेनेच्यावतीने आंदोलन करून फी दरवाढ रद्द व्हावी यासाठी मागणीचे निवेदन महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले. उपप्राचार्य एस. के. पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.दूधसाखर महाविद्यालयाने विनाअनुदानित तुकडीकरिता यावर्षी विद्यार्थ्यांकडून सात हजार रुपये फी घेतली आहे. पूर्वी ही फी दोन हजार रुपये आकारली जात होती. या वाढीव फीला विरोध करून विनाअनुदान तुकडीस पूर्ववत दोन हजार रुपयेच फी घेऊन प्रवेश द्यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, अरविंद बुजरे, राधानगरी तालुका प्रमुख भिकाजी हळदकर, नागेश आसबे, सुरेश पाटील, रघुनाथ वाळवेकर, सदाशिव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांची भेट घेऊन फी दरवाढसंदर्भात निवेदन दिले. (वार्ताहर)
‘दूध साखर’च्या वाढीव फीविरोधात आंदोलन
By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST