शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरमाथा गुलालात न्हाला

By admin | Updated: April 2, 2017 23:01 IST

लाखो भाविकांची उपस्थिती : खोबऱ्याच्या उधळणीत नाईकबाच्या नावानं चांगभलं

सणबूर : ‘चांगभलं’चा अखंड गजर आणि गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी नाईकबा देवाचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरमाथ्यावर भाविकांचा महासागर पाहावयास मिळाला.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली. दोन्ही राज्यांतील भाविक यात्रेसाठी देवस्थानावर हजर झाले आहेत. शनिवारी रात्रीपासून भाविक येण्यास सुरुवात झाली. शनिवारी नैवेद्याचा दिवस होतो. त्यामुळे भाविक सासनकाठ्यांसह देवदर्शनासाठी आले होते. पायरी ते घाटमार्ग यामुळे गजबजून गेला होता. रात्री डोंगरमाथ्यावरच भाविकांनी मुक्काम ठोकला होता. रविवारी पहाटे पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. दूरवरून आलेल्या सासनकाठ्याही त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गुलाल अन् खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झाले होते. ‘चांगभलं’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. पालखी सोहळ्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर मेवामिठाई, खेळणी, स्टेशनरी आदींची खरेदी करून भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला. कडक ऊन असल्याने व रात्रीच्या जागरणाने यात्रेकरूंनी कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरील मोकळ्या शिवारात विश्रांतीसाठी ठिय्या मांडला होता. दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर हे भाविक पुढे मार्गस्थ झाले. नाईकबाचा डोंगरमाथा व संपूर्ण परिसर गुलालाने रंगून गेला होता. यात्रास्थळी पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी पाण्याची सोय केली होती. सांगली, सातारा, मिरज, इस्लामपूर, कोल्हापूर, शिराळा, इचलकरंजी, कऱ्हाड, पाटण व कर्नाटक राज्यातील एसटी आगारामार्फत मोठ्या प्रमाणात एसटीची सोय करण्यात आली होती. यात्रास्थळी तेरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. दोन वॉच टॉवर उभारण्यात येऊन त्यावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल तसेच वीजवितरणचे कर्मचारी यात्रास्थळी थांबून होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, नायब तहसीलदार विजय जाधव, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्यासह पाच पोलिस उपनिरीक्षक साठ कर्मचारी, वीस वाहतूक कर्मचारी, १२७ होमगार्ड, आरसीपी दल तैनात होते. परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक राग सुधा आर यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. (वार्ताहर) संशयास्पद वावरणाऱ्या आठजणांवर कारवाईयात्रेतील हालचालींवर पोलिस अधिकारी व कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यावेळी आठजण यात्रेत संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बीड, नांदेड, लातूर येथील असल्याचे समोर आले. संबंधितांजवळ विभागातील यात्रांच्या तारखांची यादीही पोलिसांना आढळून आली. त्या आठजणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.