शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

पानसरे हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल तावडेचीच

By admin | Updated: September 7, 2016 01:14 IST

पोलिसांना संशय : पनवेलला छाप्यासाठी गेलेली पोलिस पथके परतली

कोल्हापूर : घेतली असता मोटारसायकल मिळाली नाही. यासंबंधी तावडेकडे चौकशी केली असता तो माहिती देण्यास तयार नाही. त्याची मोटारसायकल अचानक गायब होण्यामागे दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्याने कोणत्याही पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीची फिर्याद दिलेली नाही की कुणाला विकलेली नाही. अज्ञातस्थळी ठेवलेल्या मोटारसायकलीसह अग्निशस्त्रांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. तावडे हा ‘सनातन’ संस्थेमध्ये एका उच्चपदावर होता. त्याचे दीर्घकाळ कोल्हापुरात वास्तव होते. पिस्तुल, रिव्हॉल्व्हर उपलब्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. त्यामुळे पानसरे हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता तपास पथकाने वर्तविली आहे. मंगळवारी सायंकाळी पथक कोल्हापूरला माघारी परतले. त्यानंतर तावडेकडे पोलिस लाईनमधील एका कक्षात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी) --------------अवमान याचिकेवर १३ सप्टेंबरला सुनावणी तावडेची चौकशी आमच्यासमोर व्हावी, त्यासाठी आम्हाला हजर राहण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे केला होता. त्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु दोन दिवस पोलिसांनी अ‍ॅड. इचलकरंजीकर यांना तावडेची भेट दिली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका सत्र न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी दिवाणी न्यायाधीश यु. बी. काळपगार यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी तावडे गेली दोन दिवस कोल्हापुरात नाही. त्याला तपासासाठी पोलिस पनवेलला घेऊन गेले होते. त्यामुळे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांना त्याची भेट देता आली नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावर न्यायालयाने १३ सप्टेंबरला अवमान याचिकेवर निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट केले. ------------पनवेल रुग्णालयात तपासणी तावडे याला तातडीने आमच्यासमोर हजर करा, त्याची प्रकृती ठीक नाही, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत वैद्यकीय तपासणी केलेली नाही, असे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर पोलिसांनी पनवेल शासकीय रुग्णालयात तावडेची वैद्यकीय तपासणी केल्याचा रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केला. मारहाणीची तक्रार करणारतावडे याला अमानुषपणे कोल्हापूर पोलिस मारहाण करत आहेत. ‘सीबीआय’च्या ताब्यात असताना रवी पाटील नावाच्या व्यक्तीने त्याला मारहाण केली होती. तीच व्यक्ती याठिकाणीही मारहाण करत आहे. हा पोलिस कोण? याची चौकशी करावी, तसेच पोलिसांच्या वर्तवणुकीसंबंधी तक्रार पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करणार असल्याचे अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी सांगितले. रविवारी रात्री पनवेल येथे तपासासाठी घेऊन गेलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला मंगळवारी रात्री कोल्हापुरात आणले. त्याची रात्री साडेनऊच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांनी तावडे याचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.