शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आईकडूनच नवजात मुलीला पुरण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 18:07 IST

कोल्हापूर : जन्मत:च ओठ व टाळा दुभंगलेल्या अवस्थेत जन्माला आलेल्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून खड्ड्यात पुरण्याचा जन्मदात्री आई आणि आजीचा प्रयत्न गांधीनगर पोलिस आणि नागरिकांनी मंगळवारी हाणून पाडला. त्यांच्या या सतर्कतेमुळे एक दिवसाच्या या नवजात मुलीचा जीव वाचला. ही घटना गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील शांतीप्रकाशनगर येथे घडली.याप्रकरणी आई सारिका लखन मोरे ...

ठळक मुद्देगडमुडशिंगीतील शांतीप्रकाशनगर येथील प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीव वाचलागांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद

कोल्हापूर : जन्मत:च ओठ व टाळा दुभंगलेल्या अवस्थेत जन्माला आलेल्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून खड्ड्यात पुरण्याचा जन्मदात्री आई आणि आजीचा प्रयत्न गांधीनगर पोलिस आणि नागरिकांनी मंगळवारी हाणून पाडला. त्यांच्या या सतर्कतेमुळे एक दिवसाच्या या नवजात मुलीचा जीव वाचला. ही घटना गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील शांतीप्रकाशनगर येथे घडली.

याप्रकरणी आई सारिका लखन मोरे (वय २६, मूळ राहणार तासगांव रोड, ता.मिरज, जि. सांगली ) आणि आजी नकोशा सिद्धाप्पा भोसले (वय ४८, रा. शांतीप्रकाश नगर, गड मुडशिंगी, ता. करवीर) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गांधीनगर पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गांधीनगर रेल्वे फाटक येथील लखन मोरे यांना पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. त्यामुळे त्यांनी सारिका हिच्याशी दुसरा विवाह केला. सारिका ही सोमवारी (दि.२८) तिच्या आईच्या घरात प्रसृत झाली. पण, या एक दिवसाच्या नवजात मुलीचे ओठ जन्मत:च दुभंगलेले होते. त्यातच मुलगी झाल्याने पती नांदवणार नाही, या भितीने मंगळवारी सकाळी आई सारिका आणि आजी नकोशा भोसले यांनी बाळाला पुरण्यासाठी कापडात गुंडाळले.

आजी नकोशा हिने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे खड्डा काढला, त्यानंतर त्या दोघींनी बाळाला खड्डयात ठेवले. दरम्यान, या प्रकाराची कुणकुण शेजाºयांना लागली. त्यांनी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. त्यांनी याची माहिती तत्काळ गांधीनगर पोलिसांना दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, महिला पोलिस नाईक सुप्रिया कचरे, अंजली सावंत आदी घटनास्थळी आले. त्यांनी या नवजात मुलीला पुरत असताना त्या दोघींना रंगेहाथ पकडले. नंतर गांधीनगर पोलिस ठाण्यात आणून या दोघींवर भारतीय दंडविधान संहिता कलम ३०७, ३१५ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सारिका आणि या नवजात मुलीला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) प्रसुती विभागात दाखल करण्यात आले आहे.

बाळाचे वजन ३.२ किलो असून ते ठणठणीत आहे. स्माईल ट्रेड या उपचारपद्धतीमुळे दुभंगलेले ओठ व टाळ्याची शस्त्रक्रिया होऊ शकते.-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.