शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र

By admin | Updated: December 26, 2014 23:52 IST

कोल्हापुरात उपचार : अचानक हात-पाय लुळे पडलेल्या प्रथमेशची कहाणी

रवींद्र हिडदुगी - नेसरी--पुढील उपचारासाठी मुलाला दोन लाखांवर खर्च येणार आहे. त्याला मुंबईला घेऊन जावा, असा सल्ला डॉक्टरांकडून मिळताच सोबत असणाऱ्या आई व आजीचे हात-पाय गळाले. काही सुचेनासे झाले. मुंबईला न जाता तिने कोल्हापूरचे एक खासगी हॉस्पिटल गाठले. तेथे तातडीच्या इंजेक्शनसाठी १३ हजारांची जोडणा करा, असे सांगताच हताश झालेल्या आईने मंगळसूत्र व कर्णफुले विकण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील सराफ गुजरीत आपले दागिने विकण्यासाठी गेले असता त्यांना कुठल्याही सराफाने जवळ केले नाही. शिवाय हे दागिने चोरीचे असल्याचाही काहींनी संशय व्यक्त केला. मुलाच्या उपचारासाठी तिने शेवटी माहेर गाठले आणि ओळखीच्या सराफाकडे जाऊन आपले मंगळसूत्र, कर्णफुले १३ हजारांना विकले अन् मुलासाठी जीव कासावीस झालेल्या आईने पुन्हा कोल्हापूर गाठले.ही करुण कहाणी आहे प्रथमेश प्रदीप कांबळे या सात वर्षांच्या बालकाची. त्याचे मूळ गाव भैरेवाडी असून, त्याचे आजोळ नेसरी आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो आजोळी नेसरी येथे आईसोबत आला होता. त्याला अचानक उलट्या सुरू झाल्याने खासगी डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दोनच दिवसांत पळणारा, दौडणारा प्रथमेश थांबला. त्याचे हात-पाय लुळे पडले. त्याचे चालायचे बंद झाले.भयभीत होऊन आई निर्मलाने मुलाला नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने डॉ. गवळी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांनी त्याला कोल्हापूर सीपीआर येथे नेण्याचा निर्णय घेतला. शासकीय रुग्णवाहिकेने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे त्याची तपासणी केली असता जीबीएस (गीयाबार सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार झाल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी दोन लाखांवर खर्च अपेक्षित असल्याचे सांगून प्रथमेशला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.दरम्यान, या दुर्मीळ आजाराचे निदान झाल्याचे कळताच डॉक्टरांसह नेसरीकरांनी प्रथमेशच्या उपचारासाठी धडपड सुरू केली. दानशूर व्यक्ती, संस्था यांना घेऊन बरीचशी रक्कम गोळा केली. शालेय विद्यार्थ्यांनी तर आपल्या खाऊचे पैसे जमा करून हातभार लावला. सर्व शाळा, महाविद्यालयासह गडहिंग्लज येथील प्रा. अरविंद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गडहिंग्लज येथेही समाधानकारक रक्कम गोळा झाली.नेसरी ग्रामपंचायतीने तर तातडीने बैठक घेऊन मदत गोळा करण्यास मोलाची साथ दिली. त्यासाठी बँक आॅफ इंडिया येथे मदतीसाठी बचत खाते सुरू केले. तेथे दानशूर व्यक्ती, संस्था मदत जमा करीत आहेत.डॉक्टरांनीच घेतला पुढाकाररुग्णांना एरव्ही पुढील उपचाराचा सल्ला देऊन आपल्या कामात गुंतणाऱ्या डॉक्टरांनी मात्र प्रथमेशच्या मदतीसाठी सक्रिय सहभाग घेतल्याने डॉ. गवळी, डॉ. कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांच्याबाबत नागरिकांत कमालीचे समाधान व्यक्त होत आहे.प्रथमेशवर डॉ. वसगावकर व डॉ. परुळेकर या डॉक्टरांनी प्रयत्न चालविले आहेत. तो आता धोक्याच्या इशाऱ्यातून बाहेर आला असून, काही दिवसांत चालायला लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.