शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या काखेत बसून घातली आकाशाला गवसणी...

By admin | Updated: June 18, 2014 01:04 IST

प्रशमची दुर्धर आजारावर मात : दहावी परीक्षेत ९३.६० टक्के गुण

आदित्य वेल्हाळ ल्ल कोल्हापूरहात व पायांची न होणारी हालचाल, वयाच्या नवव्या वर्षापासून बंद झालेले चालणे; जेवण असो की दिनक्रमातील कोणतेही काम; ते आईवडिलांच्या मदतीनेच पूर्ण करणे, अशा आपल्या दुर्धर आजारावर मात करीत प्रशम प्रशांत शेंडे हा विद्यार्थी नूतन मराठी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. त्याने ९३.६० टक्के गुण मिळविले.मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगशेजारी शेंडे कुटुंबीय राहतात. त्याचे वडील शेतकरी, तर आई मृदुला या फॅशन डिझायनर आहेत. प्रशम हा जन्मानंतर सहा वर्षांपर्यंत इतर मुलांप्रमाणेच चालत होता. तो पहिलीमध्ये प्रवेशित झाल्यानंतर त्याच्या चालण्यात फरक जाणवू लागला. त्यावर आई-वडिलांनी त्याची डॉक्टरांकडून तपासणी केली.यावेळी प्रशमला ‘ड्युशन मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ (डीएमडी) हा स्नायूंचा आजार असल्याचे त्यांना समजले. त्याच्यावर उपचार सुरू ठेवत त्यांनी त्याला गुरुमहाराज वाड्यातील नूतन मराठी ब्रँचमध्ये शिक्षणासाठी दाखल केले. चौथीमध्ये गेल्यावर ‘डीएमडी’मुळे त्याच्या हातापायांची हालचाल पूर्णत: थांबली. त्यावर खचून न जाता त्याची शिक्षणाची आवड, मिळविलेले यश पाहून आई मृदुला यांनी त्याला पुढे शिकविण्याचे ठरविले. त्याला दररोज काखेतून शाळेत आणणे व घेऊन जाणे त्या करीत होत्या. आईच्या आधाराच्या जोरावर त्याने जिद्दीने शिक्षण सुरूच ठेवले. आठवीसाठी तो मिरजकर तिकटी येथील नूतन मराठी विद्यालयात दाखल झाला. निव्वळ अभ्यास हाच त्याचा दिनक्रम आणि आवड होती. त्यामुळे आजतागायत त्याने शाळेतील आपला पहिला क्रमांक सोडला नाही. दहावीत त्याने ९३.६० टक्के गुणांची कमाई केली असून संस्कृत (९८), सामाजिकशास्त्र (९४), मराठी (९३), इंग्रजी (९०), गणित (९३), विज्ञान व तंत्रज्ञान (८८) असे लक्षवेधक गुण मिळविले आहेत.