शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

जमिनीसाठी मुलानेच केला आईचा खून संशयितास अटक : गारगोटीतील ‘त्या’ खुनाचा छडा;

By admin | Updated: May 10, 2014 00:11 IST

गारगोटी : जमीन नावावर न केल्याच्या रागातून लीलाबाई महादेव जवाहिरे (वय ७०) हिचा खून करून, चोरीचा बनाव करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात

गारगोटी : जमीन नावावर न केल्याच्या रागातून लीलाबाई महादेव जवाहिरे (वय ७०) हिचा खून करून, चोरीचा बनाव करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देणार्‍या पोटचा गोळा मिलिंद महादेव जवाहिरे (वय ३९, रा. बाजारपेठ, टेंबलाई चौक, गारगोटी) याला भुदरगड पोलिसांनी आठ दिवसांत अटक केली. आज (शुक्रवार) त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि. १२) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (दि. २९ एप्रिल) ते गुरुवार (दि. १) या दरम्यान साई कॉलनी येथे राहणार्‍या लीलाबाई यांचा अज्ञात चोरट्यांनी खून केल्याची तक्रार मुलगा मिलिंद याने भुदरगड पोलिसांत दिली. साई कॉलनीतील समोरचा दरवाजा उघडून, आत जाऊन तिजोरीतील दहा हजार रुपये व कर्णफुले असा पंचवीस हजारांचा ऐवज चोेरीस गेल्याचे त्याने भासवले. संशयित आरोपीने यासंदर्भात अज्ञाताविरोधी तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय आला होता. लीलाबाई या साई कॉलनी, इंजुबाई पाणंद रोडवर राहत असलेले घर, तेथील दुकान गाळे, मोकळी जागा, अशी अंदाजे दोन गुंठे जागा भाऊ सुनील यांच्या नावावर दीड वर्षांपूर्वी केल्याचे मिलिंद यास समजताच तो आईस वारंवार जाब विचारून भांडण काढू लागला. भरचौकात तिला ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तसेच शिवार भैरी भागात असणारी बावीस गुंठे जमीन आई व चुलतभाऊ बाळासाहेब जवाहिरे यांच्या नावावर आहे. जमीन आपल्या नावावर कर असा तगादा तो आईकडे सतत करत होता. पण, आई त्याकडे दुर्लक्ष करीत होती. शिवाय साई कॉलनीतील राहते घर पोलीस असणारा भाऊ सुनील यांच्या नावावर केल्याचा राग त्याच्या मनात होता. अतिशय शांत डोक्याने नियोजनबद्धरीत्या मुलगा मिलिंद याने जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळून खून केला व भाड्याने राहणार्‍या गवंड्यावर संशय व्यक्त केला. काहीही संबंध नसताना गवंड्यांना आठ ते दहा दिवस पोलीस तपासाला सामोरे जावे लागले. त्यांचे काही सहकारी गुजरात येथे गावी गेले होते. त्यांना बोलावून घेण्यात आले. चोरीचा बनाव आणि आईचा खून करून घरातील साहित्य विस्कटून टाकले आणि चोरी झाली, असा बनाव मिलिंदने केला. पण, पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव झुरळे, दादासोा कापसे, सुरेश मेटील, अमर पाटील, मधुकर शिंदे, यांनी सापळा रचून या आरोपीस शिताफीने अटक केली. अशोक भरते हे गेले दोन दिवस गारगोटीत तळ ठोकून होते.