शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत सर्वाधिक जातवैधता बनावट प्रमाणपत्रांचे वाटप

By admin | Updated: January 6, 2015 00:51 IST

हारगेचा कारनामा : वारेंचा जबाब पूर्ण; सहीचे नमुने पडताळणीसाठी पुण्याला पाठविणार

कोल्हापूर : जातवैधता बनावट प्रमाणपत्र प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेला संशयित बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (वय ३२, रा. सलगरे, ता. मिरज, जि. सांगली) याने आपल्या साथीदारांकरवी सर्वाधिक जास्त बनावट प्रमाणपत्रे मिरज येथे वाटप केली असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. आज, सोमवारी विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनचे उपायुक्त तथा सदस्य सुनील वारे यांचा जबाब पोलिसांनी घेतला. या प्रमाणपत्रावरील सही व अधिकाऱ्यांच्या सहीचे नमुने पुणे येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पूर्ण तपासाअंती पाठविण्यात येणार आहेत.महिन्यापूर्वी कोल्हापुरात हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित हारगेचा साथीदार व मुख्य सूत्रधार समीर बाबासो जमादार (रा. मल्लेवाडी, ता. मिरज) व विचारेमाळ येथील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयातील लिपिक संशयित अनिल हरिहर ढवळे या दोघांना अटक केली. सध्या हे तिघेजण जामिनावर बाहेर आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी ५ डिसेंबर २०१४ रोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संशयित बाळासाहेब हारगेला पोलीस व या कार्यालयाचे अधिकारी यांनी बनावट प्रमाणपत्रेप्रकरणी रंगेहात पकडले होते. हारगेने सातारा जिल्ह्यातील कृष्णात आनंदा संकपाळ (वय ३२, रा. सुरुल, ता. पाटण) यांना ‘कुणबी’ जातीचे वैधता प्रमाणपत्र देतो असे सांगून त्यांची ४० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर हारगेचा साथीदार जमादारच्या घरातून पोलिसांनी प्रमाणपत्र देण्यासाठी वापरण्यात येत असलेला कागद, प्रिंटर, स्कॅनर व इतर साहित्य जप्त केले होते. हारगेने ज्यांना अशा प्रकारची बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या नावाची यादी केली. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडील २० बनावट प्रमाणपत्रे जप्त केली. यांपैकी हारगेने १५ प्रमाणपत्रे ही मिरजेत, तर सातारा जिल्ह्यात पाच दिली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.दरम्यान, ढवळेने वरिष्ठांचा सहभाग असल्याचे चौकशीत सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी समितीच्या सदस्या सचिव वृषाली शिंदे यांची चौकशी केली. त्यानंतर आज, सोमवार दुपारी सुनील वारे यांचा जबाब घेण्यात आला. येथून पुढे जातवैधता प्रमाणपत्र देणारी यंत्रणा मजबूत करू व असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊ, असे त्यांनी जबाबात म्हणणे दिले. तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.सांगली जिल्ह्यातही बनावट प्रमाणपत्रेसंशयित हारगेने कोल्हापूर जिल्ह्यात एकही प्रमाणपत्र दिले नसल्याचे तर सातारा, सांगली जिल्ह्यांत अशा प्रकारची जातवैधता बनावट प्रमाणपत्रे दिल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. या प्रकरणाचे आणखी धागेदोरे सापडतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर आता कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब घेणार आहे. जात वैधता बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. तपासासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागेल.- विद्या जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक,शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर.