शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

‘टीईटी’साठी हातकणंगलेतून सर्वाधिक १७४७ अर्ज

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

१० डिसेंंबरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा आहे.प्रक्रिया सध्या अर्जातील दुरुस्तीच्या टप्प्यात आहे.

कोल्हापूर : यंदाची महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १४ डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी १३ हजार ५४९ जणांनी जिल्ह्यातून आॅनलाईन अर्ज ३० आॅक्टोबरपर्यंत केले आहेत. त्यापैकी ११ हजार २९ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज चलन प्रिंटेड आणि अपडेटच्या टप्प्यात आहेत. सर्वाधिक अर्ज हातकणंगले तालुक्यातून, तर सर्वांत कमी अर्ज गगनबावडा तालुक्यातून आले आहेत. दरम्यान, १० डिसेंंबरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा आहे. त्यामुळे ‘टीईटी’ची प्रक्रिया सध्या अर्जातील दुरुस्तीच्या टप्प्यात आहे. शिक्षक होण्यासाठी गेल्या वर्षापासून ‘टीईटी’ परीक्षा पास होणे बंधनकारक केले आहे. यामुळे प्रत्येक वर्षी ही परीक्षा शासनाच्या शिक्षण विभागातर्फे घेतली जाते आहे. त्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात. यंदाच्या ‘टीईटी’ परीक्षेची तयारी शिक्षण प्रशासन करत आहे. अर्ज भरताना झालेल्या चुकांसाठी आॅनलाईन दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण आलेल्या १३ हजार ५४९ पैकी १२ हजार ५५९ अर्जांचे चलन प्रिंट करण्यात आले आहे. ११ हजार ५५९ अर्जांचे चलन अपडेट केले जात आहे. आतापर्यंत एकूण ११ हजार २९ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. स्वीकारलेल्या अर्जाच्या उमेदवारास परीक्षेस बसता येणार आहे. यासंबंधी ‘लोकमत’शी बोलताना उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम म्हणाले, आॅनलाईन अर्ज दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्तपत्रांतून दुरुस्तीसाठी उमेदवारांना आवाहन केले आहे. गतवर्षापेक्षा यंदा अर्ज कमी आले आहेत. (प्रतिनिधी)तालुकानिहाय ‘टीईटी’चे अर्ज आजरा - २९३गगनबावडा - ७२ भुदरगड - ८१३ चंदगड - ५७१ गडहिंग्लज - ६१४ हातकणंगले - १७४७ कागल - १०९२ करवीर - १६७९ पन्हाळा - ८०४ राधानगरी - ८५२ शाहूवाडी - ४३९ शिरोळ - ८०४ कोल्हापूर महापालिका - १२५५.