शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

वारसांच्या मदतीमध्ये अडचणीच अधिक

By admin | Updated: August 13, 2015 00:53 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : सहा महिन्यांत सातपैकी दोघांच्या वारसांना मदत; निकष शिथिल करण्याची मागणी

राजाराम लोंढे- कोल्हापूर  कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये अडचणीच अधिक आहेत. सहा महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात सात शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली; पण त्यापैकी केवळ दोघांच्याच वारसांना आतापर्यंत मदत मिळू शकलेली आहे. उर्वरित दोन प्रस्ताव अपात्र, तर दोन प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे उत्पादनही बेभरवशाचे झाले आहे. या अगोदर विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे ऐकले जायचे; पण आता आत्महत्यांचे लोण कोल्हापूरसारख्या सुपीक जिल्ह्णात पसरू लागले आहे. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्णात ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; तर गेल्या सहा महिन्यांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘मुख्यमंत्री सहायता निधी’तून एक लाखाची मदत देण्यात येते. पण या मदतीचे निकष व अटी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या दृष्टीने फारच अडचणीच्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन हवी. त्याचबरोबर त्याने राष्ट्रीयीकृत अथवा विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून घेतलेलेच कर्ज थकले असले पाहिजे. त्याचबरोबर कर्जवसुलीचा तगादा लागलेला हवा. त्याच्या संबंधित वित्तीय संस्थेने कारवाई सुरू केली असेल आणि तिला कंटाळून आत्महत्या केली असेल तरच मदत दिली जाते; पण सामान्य शेतकरी हा अब्रू्रला घाबरत असतो. कर्जाच्या वसुलीसाठी संस्थेचे कर्मचारी दारात जरी आले तरी त्याला जीव नकोसा होतो. त्याचबरोबर केवळ शेतीसाठी कर्ज घेतले असले तरच मदत मिळते. शेतकऱ्याने घराचे बांधकाम, मुलांच्या लग्नासह इतर कारणांसाठी काढलेले कर्ज असेल तर मदत दिली जात नाही. राष्ट्रीयीकृत बॅँका, विकास संस्थांचे कर्ज असेल तरच मदत मिळते. कोल्हापूर जिल्ह्णात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने सरकारी बॅँकांकडून अपेक्षित कर्ज मिळत नाही. सहकारी बॅँका, पतसंस्था हाच कर्जासाठी पर्याय असल्याने या कर्जालाही मदत मिळाली पाहिजे.शैक्षणिक मदतीपासून कोल्हापूर वंचितआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शासन पाचशे रुपये आर्थिक मदत तर दहावी-बारावीची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; पण हा निर्णय केवळ विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीच लागू असल्याचे दिसते.मदतीचे निकष बदलावेत, यासाठी गेले अनेक वर्षे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; पण जाचक निकष मदतीच्या आडवे येत आहेत. २००६ च्या शासन निर्णयानुसारही निकषांत बदल केलेले नाहीत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबे मदतीपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर मोठे झालेले नेते याबाबत गंभीर नाहीत, हेच दुर्दैवी आहे. - शिवाजीराव परुळेकर (महासचिव, जनता दल) दहा वर्षांतील आत्महत्या केलेले शेतकरी व मदत मिळालेल्या पात्रची संख्यावर्षआत्महत्यापात्रअपात्रप्रलंबित २००४२२--२००५३३--२००६१४१०४-२००७१६१४२-२००८१८१६२-२००९११७४-२०१०७६१२०११५२३२०१२२०२-२०१३२११-२०१५७२२३संपूर्ण कर्जमाफीच हवीज्या थकीत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आपले जीवन संपविले, ते कर्ज माफ करणे गरजेचे आहे. अन्यथा कर्ज मागील कुटुंबाची पाठ घेते आणि वडिलांनंतर मुलग्यावर आत्महत्येची वेळ येते.