शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘गर्जन’च्या शाळेला नवे रूप देण्यास सरसावले हात ; ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद : दिवसभरात लाखाहून अधिक निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:48 IST

कोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाºया पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेल्या करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेला आता नवे रूप मिळणार आहे. ‘लोकमत’च्या आवाहनानंतर

ठळक मुद्दे भौतिक सुविधा विकासास प्राधान्य देणार मुलींसाठी स्वच्छतागृह, शाळेस संगणक, सुसज्ज ग्रंथालय यापैकी शाळेची सर्वांत निकडीची गरज असेल तरी पूर्ण करण्यात येईल.

कोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेल्या करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेला आता नवे रूप मिळणार आहे. ‘लोकमत’च्या आवाहनानंतर गुरुवारी समाजातून आर्थिक पाठबळाचा ओघ सुरू झाला आणि यात एकाच दिवसात लाखांहून अधिकचा निधी उपलब्ध झाला आहे.

गुणवत्तेच्या जोरावर ‘गर्जन’ शाळेने वेगळा ठसा उमटविला आहे. शालेय पातळीवरील कोणत्याही स्पर्धेत अव्वल स्थानी राहणाºया या शाळेची भौतिक सुविधांच्या डळमळीत पायावर वाटचाल सुरू आहे. कष्टकरी, मजूर आणि सर्वसामान्य पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी आधार असलेल्या या शाळेला समाजातून काही मदत मिळावी, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या शाळेबाबतचे वास्तव ‘लोकमत’ला सांगितले.

यावर ‘लोकमत’ने गुरुवारी ‘सामाजिक संस्थांच्या दातृत्वाने बहरेल ‘गर्जन’ची शाळा’ या वृत्तातून या शाळेच्या गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकला. त्यासह शाळेला आवश्यक असणाºया भौतिक सुविधांबाबत मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.त्यास प्रतिसाद म्हणून अनेक सामजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी अगदी व्यक्तिगत पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याचे ‘लोकमत’कडे कळविले. आम्ही मदत करतो, काम उभे राहू दे मग आमची नावे जाहीर करा, असे या मान्यवरांचे म्हणणे होते.डॉ. संजय डी. पाटील यांचा पुढाकार‘लोकमत’च्या कोणत्याही उपक्रमास पाठबळ देणाºया डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी हे वृत्त वाचून शाळेला एक लाखापर्यंतची कोणतीही मदत करणार असल्याचे सांगितले. मुलींसाठी स्वच्छतागृह, शाळेस संगणक, सुसज्ज ग्रंथालय यापैकी शाळेची सर्वांत निकडीची गरज असेल तरी पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी आजच शुक्रवारी प्राचार्य के. टी. जाधव यांना प्रत्यक्ष त्या शाळेला भेट देण्यास पाठविणार आहे. ते पाहणी करून आल्यानंतर काय मदत करायची याचा निर्णय घेऊ, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. पाटील यांचा रविवारी वाढदिवस आहे, ते शाळेला मदत करून तो अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहेत. 

सहजपणे ‘गर्जन’ या गावामध्ये जाण्याचा योग आला. यावेळी तेथील या गुणवत्तापूर्ण शाळेला भौतिक सुविधा नसल्याचे समजले. तिला समाजाच्या मदतीचा हात मिळाला तर या परिसरातील गोरगरिबांच्या शिक्षणाचा आधार भक्कम होईल, असा विचार मनात आला. याबाबत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांना ‘गर्जन’ शाळेचा विषय सांगितला. या शाळेला पाठबळ देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत ‘लोकमत’चे आभार व्यक्त करतो.- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेबैठक घेऊन निर्णयया शाळेला काय मदत हवी याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची बैठक घेऊन शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्ध होणारा निधी व त्यातून करावयाची कामे यांचे नियोजन केले जाणार आहे.