शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur- जिल्ह्यात उच्चांक ! ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:16 IST

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांक ! ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतली लसदुसरा डोस घेतलेले नागरिक २७ हजार ८४२

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली.जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ११८ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. ६० वर्षांवरील ४९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.वयाच्या ४५ वर्षांनंतरच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला. १ एप्रिलपासून हा निर्णय घेण्यात आला. परंतु दोन एप्रिलपासून खऱ्या अर्थाने लसीकरण सुरू झाले. यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व यंत्रणांना जबाबदारी देऊन स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुराव्यासाठी काही तालुके वाटून दिले. परिणामी आता सर्वत्र लसीकरणाने वेग घेतला आहे.

  • पहिला लस घेतलेले नागरिक ४ लाख ३१ हजार ४१९
  • दुसरा डोस घेतलेले नागरिक २७ हजार ८४२
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर