शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर आरोग्य परिचरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

कोल्हापूर : आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या परिचरांनी बुधवारी दुपारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आयटक ...

कोल्हापूर : आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या परिचरांनी बुधवारी दुपारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

आयटक संलग्न कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने हा मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर घोषणा देण्यात आल्या. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या परिचरांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांना अर्धवेळ असल्याकारणाने कायद्याने मिळणाऱ्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात मोठे काम करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या मागण्यांचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी कॉ. दिलीप पवार यांनी केली. यावेळी त्यांच्यासह बाबा यादव, एस. बी. पाटील, कुंडलिक एकशिंगे, सुशीला यादव, भगवान यादव, उत्तम पाटील यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नामदेव मोरे यांच्याशी चर्चा केली.

सेवेत कायम करावे, ७ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकांची अंमलबजावणी करावी, निवृत्तिवेतन सुरू करावे, वेतन रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी, शिपाई भरतीवेळी परिचरांना प्राधान्य द्यावे, सरकारी विमा योजनेचा लाभ मिळावा, दिवाळी बोनस मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

१६१२२०२० कोल झेडपी ०१

विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

छाया - नसीर अत्तार