शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुरगूडला विभागीय कुस्ती स्पर्धेला उत्साहात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:14 IST

मुरगूड : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात उत्साहात सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देमंडलिक महाविद्यालयाचे आयोजन कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २१0 मल्लांचा विक्रमी सहभागस्पर्धेतून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी पुरुष गटातून फ्री स्टाइल १0 मल्ल, पुरुष ग्रीको रोमन १0 मल्ल व महिला फ्री स्टाइल १0 मल्ल असा ३0 मल्लांचा संघ निवडण्यासाठी निवड समिती

मुरगूड : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात उत्साहात सुरु झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांतून पुरुष गटात १८0 तर महिला गटात ३0 मल्लांनी विक्रमी सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धेत पुरुषांच्या फ्री स्टाइल व ग्रीको रोमन तर महिलांच्या फ्री स्टाइल प्रकारांत कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेअंती शिवाजी विद्यापीठाचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठीचा संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष गजानन गंगापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कुस्तीला चालना मिळावी, यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच मुरगूडला आंतरराष्टÑीय कुस्ती प्रशिक्षण देणारा साई आखाडा सुरू झाला. त्यामुळेच मुरगूडचे नाव आज आंतरराष्टÑीय स्तरावर घेतले जाते. आज मुरगूड परिसरात आंतरराष्टÑीय स्तरावरचे मल्ल घडू लागले ही अभिमानाची गोष्ट आहे.

संयोजक प्रा. शिवाजी पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, सुखदेव येरुडकर, नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, पांडुरंग भाट, सुहास खराडे, राष्टÑीय प्रशिक्षक दादासो लवटे, किरण गवाणकर, बाजीराव गोधडे, उपप्राचार्य शिवाजीराव होडगे, दिलीपराव कांबळे टी. एम. पाटील उपस्थित होते.

या स्पर्धेतून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी पुरुष गटातून फ्री स्टाइल १0 मल्ल, पुरुष ग्रीको रोमन १0 मल्ल व महिला फ्री स्टाइल १0 मल्ल असा ३0 मल्लांचा संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य प्रा, संभाजी पाटील, दिलीप पवार (सातारा), बाजीराव पाटील (तिसंगी), उत्तमराव पाटील (सांगली), भाऊसाहेब पाटील (सांगली), चंद्रकांत चव्हाण (राज्य समन्वयक) हे उपस्थित होते. पंच म्हणून राजाराम चौगले, दादासो लवटे, बापूसो लोखंडे, संभाजी पाटील, मारुती उर्फ बट्टू जाधव, संदीप पाटील, संभाजी वरुटे, बबन चौगले, बाळासाहेब मेटकर, प्रकाश खोत, दयानंद खतकर, प्रवीण मांगोरे, सागर देसाई, संदीप गायकवाड यांनी काम पाहिले. समालोचन राजाराम चौगले यांनी केले.मुरगूड येथे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन वीरेंद्र मंडलिक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अर्जुन कुंभार, जयसिंग भोसले, सुखदेव येरुडकर, नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, पांडुरंग भाट, सुहास खराडे, दादासो लवटे, किरण गवाणकर, शिवाजीराव होडगे उपस्थित होते.