शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर धावू लागल्यानंतरच मासिक पास मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

कोल्हापूर-पुणे, सातारा, मिरज, सांगली या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सेवा मध्य रेल्वेकडून दिली जाते. कोरोनापूर्वी या पॅसेंजरमधून रोज सुमारे पाच ...

कोल्हापूर-पुणे, सातारा, मिरज, सांगली या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सेवा मध्य रेल्वेकडून दिली जाते. कोरोनापूर्वी या पॅसेंजरमधून रोज सुमारे पाच हजारजण प्रवास करत होते. त्यात नोकरदार, छोटे व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी मार्चपासून पॅसेंजर रेल्वेची सेवा बंद झाली. ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे एस.टी. बसेससह अन्य पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा या प्रवाशांना आधार घ्यावा लागत आहे. मुंबईतील लोकल सुरू झाल्याच्या धर्तीवर कोल्हापूरमधील पॅसेंजर रेल्वेसह मासिक पासची सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन

कोल्हापूर-तिरूपती

कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस)

कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस)

कोल्हापूर-अहमदाबाद

कोल्हापूर- दिल्ली

कोल्हापूर-नागपूर

कोल्हापूर-धनबाद

कोल्हापूर-गोंदिया

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाचा मासिक पास दिला जात आहे. मग, आम्हाला का नाही?, असा प्रश्न कोल्हापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, जयसिंगपूर येथील प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांची गुरुवारी पुणे येथे बैठक झाली. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज येथील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पॅसेंजर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

- शिवनाथ बियाणी, कोल्हापूर.

गेल्या २५ वर्षांपासून मिरजहून कोल्हापूरला पॅसेंजर रेल्वेद्वारे येत आहे. ही सेवा बंद असल्याने आम्हा प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूरची पॅसेंजर रेल्वे सेवा लवकर सुरू करावी.

-इम्तियाज अली शेख, मिरज.

वेळेची बचत आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता रेल्वे आम्हाला उपयुक्त ठरते. पॅसेंजर सेवा बंद असल्याने आमची अडचण होत असून, आर्थिक भुर्दंडदेखील बसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी.

- उदय मोरे, हातकणंगले.

प्रतिक्रिया

कोल्हापूरमधून विविध मार्गांवर सहा पॅसेंजर रेल्वेची सेवा आहे. पण, सध्या त्यांची सेवा बंद आहे. पॅसेंजर रेल्वेची सेवा सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेच्या विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

-ए. आय. फर्नांडिस, प्रबंधक, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस

240921\24kol_7_24092021_5.jpg

डमी (२४०९२०२१-कोल-लोकमत डमी१२१८)